Ticker

6/recent/ticker-posts

यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट कधी उगवणार? ------------------------------- ऊन वारा पाऊस झेलत, पाठीवरचा संसार संपेना..

उत्तम बोडखे,आष्टी. ---------------- 'नेमीच येतो पावसाळा..!' या म्हणीप्रमाणे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की,यांच्या जिवाची परवड सुरू झालीच समजा.पोटाची टिच भर खळगी भरण्यासाठी यांना गावोगावी जिथे काम मिळेल तिथे दगडाला फोडत आपल्या जीवनाचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधूनसुद्धा सुरु ठेवावा लागतो.असाच एक सुंदर झोपडीचा वास्तव नयनरम्य पहाटेचा प्रसंग आष्टीतील छायाचित्रकाराने टिपला आहे. आपल्या जीवनामध्ये तीन पिढ्यांची गरज नाही परंतु स्वतःच्या पोटाचा आजचा प्रश्न मिटवण्यासाठी ही मंडळी झोपड्या करून माळरानावर राहते.नेहमीचा पाठीवरचा संसार जेसीबी पोकलेन पोकलेन ट्रॅक्टर सोबत घेऊन ठेकेदार जिथे काम देईल तिथे विहीर खोदकाम असो रस्त्याचा भरावा असो ही यांत्रिकी कामे अत्यंत अवजड आणि धोक्याची कामे करताना सुद्धा त्यांचा जीव मागे घेता येत नाही.अशावेळी त्यांची छोटी मुले मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. जिम्मेदारीची यांत्रिक कामे करताना अनेक वेळा त्यांचा जीव जातो.. त्यांची चिमुकले मुले मुली हे कामावर असताना मात्र पालावर खेळत राहतात. अत्यंत कमी वयात शाळेसारख्या ज्ञान मंदिरात जाऊन भविष्य घडविण्याच्या वयात या मुलांना पालावर राहण्याशिवाय पर्यावरण नाही. पाठीवर संसार.. -------------------------- जेसीबी ,फोकलेन, टिप्पर,ट्रॕक्टर सोबत घेऊन ठेकेदारीचे कामे करणारे मग विहीरा खोदकाम असो,रस्ता भराव असो अथवा ईतर यांत्रीकी किमे असो करतात.पण त्याचे चिमुकले मुले मुली मात्र पालवर खेळतात.शाळेत जाण्याच्या वयात केवळ खेळण्यात वय घातल्याने पुढची पिढी ही अशाच कामावर राहण्याशिवाय पर्यावरण नाही.त्यांच्यासाठी शासनाच्या योजना कोणत्या आहेत? त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? पालावर प्रबोधन होते का? मुलांना शिक्षण मिळते का? दरवर्षी यामध्ये किती परिवर्तन होते? हे आणि असे अनेक प्रश्न स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही अनुत्तरीत आहेत हे वेदनादायी आहे.पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि स्वतंत्र्याच्या उत्सव करण्याच्या शासनाच्या प्रशासनाच्या मोठमोठ्या गप्पा असतानाच या गरिबांसाठी मात्र शाश्वत विकास आणि शिक्षणासंदर्भात ठोस निर्णयाची अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील समाज धुरीनांमधून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या