
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील केळसांगवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मनिषा ज्ञानेश्वर पडोळे यांची अविरोध निवड झाली आहे.केळसांगवी ग्रामपंचायतवर आ.सुरेश धस यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे.सरपंचासह सर्वची सर्व सदस्य त्यांच्या गटाचे विजयी झालेले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला पदाची संधी मिळावी या उद्देशाने आ.सुरेश धस यांनी ठराविक कालावधी दिला आहे.विद्दमान उपसरपंच गणेश शिवाजी पडोळे यांनी आपली ठरलेली मुदत संपल्यामुळे राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया झाली.सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेविका अनिता कवडे यांनी काम पाहिले.केळसांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पडोळे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी आज शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली.त्यात त्यांची निवड करण्यात आहे.माजी आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच अजित घुले यांच्या नेतृत्वाखाली केळसांगवी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ.मनीषा ज्ञानेश्वर पडोळे यांची अविरोध निवड करण्यात आली. जनतेतुन सरपंचपदी अजित घुले यांची निवड झाली होती. पीठासीन अधिकारी सरपंच अजित घुले यांच्या अध्यक्षतेखाली नुतन उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी माजी आ.सुरेश धस गटाचे सौ.मनिषा ज्ञानेश्वर पडोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने अविरोध निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा सरपंच अजित घुले यांनी जाहीर केले.यावेळी सहायक म्हणुन तलाठी, ग्रामसेविका अनिता कवडे यांनी सहकार्य केले.नुतन उपसरपंच सौ.मनिषा पडोळे यांचे माजी आ.सुरेश धस, सरपंच अजित घुले,युवा नेते जयदत्त धस,शहादेव दिलीप पडोळे,ग्रा.पं.सदस्या सौ.सारिका चंद्रकांत घुले,ग्रा.पं. सदस्या शारदा बाबासाहेब भालके,मावळते उपसरपंच ,गणेश शिवाजी पाडोळे ग्रा.पं.सदस्य, पोपटराव घुले सर, बबनराव पडोळे, भाऊसाहेब घुले, माजी सरपंच महादेव पडोळे, ज्ञानेश्वर पडोळे,गोकुळ भालके, हर्षल घुले, तुकाराम पडोळे,मनोहर पडोळे, बापूराव घुले, किशोर घुले,डॉ. चंद्रकांत घुले,विकास बोराडे,श्याम बोराडे,बाळा भालके, काकासाहेब पडोळे, हनुमंत पवार,आप्पासाहेब पडोळे,छबु बोराडे,महादेव पडोळे, शहादेव पडोळे,नितीन घुले,कृष्णाजी घुले, चंद्रकांत घुले,गोवर्धन घुले, दादासाहेब भालके, तुषार पडोळे,राजेंद्र पडोळे, नवनाथ घुले, माजी सरपंच शांताराम भालके आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचीत उपसरपंच सौ.मनिषा पडोळे यांचा सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या