Ticker

6/recent/ticker-posts

क-हेवाडी येथील हरिनारायणस्वामी विद्यालयात रंगला आषाढीनिमित्त दिंडी सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) आषाढीवारीनिमित्त पंढरीत ३० लाख वारकरी दर्शनासाठी आले होते.पंढरीत शाळकरी विद्यार्थ्यांना जाता येत नाही म्हणून शाळेत जाऊन पायी दिंडी आयोजित करुन भक्तीभाव वाढवावा यासाठी हरिनारायण स्वामी विद्यालयाने विद्यार्थ्यांना वारकरी वेशात आणुन गावभर दिंडी मिरवणूक केली.यात माता,पुरुष पालक सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायाची टाळ-मृदंग दिंडी महाराष्ट्राची अध्यात्मीक ओळख आहे.हा ठेवा पुढील पिढीने जतन करावा.याउद्देशाने मुख्याध्यापक संतोष नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानोबा तुकाराम ...ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दिंडी प्रदक्षिणा झाली.दिंडीत फुगड्या झाल्या.भक्तीमय वातावरणाने क-हेवाडी परिसर फुलला होता.दिंडीत सहभागी होतांना रामकृष्ण हरी,ज्ञानोबा माऊली...तुकाराम या नामगजराने दिंडीचा प्रारंभ झाला.या दिंडीत सर्व विदयार्थी-शिक्षक पालक सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्मिणीची विद्यार्थी-विद्यार्थीनी विद्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली.वेशीत आल्यानंतर सर्वांनी फुगड्यांचा मनसोक्त आनंद घेतला.दिंडीत सजावलेल्या माऊलींच्या पालखीचा समावेश होता.वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.बालवारक-यांचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले.आयोजीत दिंडीत ८ वी. ते १० वी. विद्यार्थीनी सहभाग घेतला. टाळमृदंगांनी,विठूनामांनी मार्ग निनादला. शिक्षीका श्रीमती बी.बी.धोंडे, शिक्षक पंजाब बांगर,भारत दळवी,संजय राऊत ,बाळासाहेब भोपळे,रामदास सांगळे यांनी नियोजन केले तर मुख्याध्यापक संतोष नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक क-हेवाडी गावच्या सरपंच छाया गायकवाड,उपसरपंच बाळासाहेब सांगळे,ग्रामस्थ गोरख सांगळे,बबन सांगळे, सोमीनाथ सांगळे, राम सांगळे, नवनाथ सांगळे,बाजीराव सांगळे, नामदेव सांगळे,रामदास सांगळे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी इतर ग्रामस्थ शिक्षक ,कर्मचा-यांची दिंडीत उपस्थिती होती.दिंडीत सहभागी मुलांना फळे वाटप करण्यात आली. वृक्षारोपन करुन दिंडीची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या