
आष्टी (प्रतिनिधी)
वारकरी संप्रदायाची टाळ-मृदंग दिंडी महाराष्ट्राची अध्यात्मीक ओळख आहे. हा ठेवा पुढील पिढीने जतन करावा या हेतुने मुख्याध्यापक दत्ताभाऊ सायकड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील दिंडी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने दिंडीस प्रारंभ करण्यात आला. दिंडीत सहभागी होतांना रामकृष्ण हरी,ज्ञानोबा माऊली... तुकाराम या नामगजराने दिंडीचा प्रारंभ झाला. या दिंडीत सर्व विदयार्थी-शिक्षक पालक सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्मिणीची विद्यार्थी-विद्यार्थीनी विद्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. वेशीत आल्यानंतर सर्वांनी फुगड्यांचा मनसोक्त आनंद घेतला. दिंडीत सजावलेल्या माऊलींच्या पालखीचा समावेश होता. वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. बाल वारक-यांचे नागरीकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.आयोजीत दिंडीत ५ वी. ते १० वी. विद्यार्थीनी सहभाग घेतला. टाळ-मृदगांनी, विठूनामांनी मार्ग निनादला. शिक्षक सुनिल गाडे यांनी नियोजन केले. तर मुख्याध्यापक दत्ताभाऊ सायकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक अशोक गाडे, नवनाथ जगताप, चंद्रकांत फुले,राजु हजारे, अशोक गवारे,संतोष गदादे,शिवाजी कांबळे, दत्ता शेलार, रामदास झगडे,चंद्रकांत तुपे आदी सर्व कर्मचा-यांनी यात उपस्थिती दर्शवली. दिंडीत सहभागी मुलांना फळे वाटप करण्यात आली. वृक्षारोपन करुन दिंडीची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या