Ticker

6/recent/ticker-posts

बाबासाहेब पोकळे "बेलगाव भूषण" सौ.सुनीता खाडे "आदर्श माता "पुरस्काराने सन्मानित

आष्टी ( प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील नागरी सत्कार समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाळा महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलगावचे नाव उज्वल करणाऱ्या व आपला व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यक्तीला " बेलगाव भूषण ", आपल्या मुलाबाळावर योग्य संस्कार करून त्यांना घडवणाऱ्या मातेस "आदर्श माता " हे दोन पुरस्कार राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.बेलगावचा युवक बाबासाहेब छगन पोकळे,नागेश छगन पोकळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसलाही अनुभव नसताना सुरू केलेला "मातोश्री ग्रॅनाईट,आष्टी " हा व्यवसाय अल्पावधीत भरभराटीस आणला. सुरुवातीच्या काळात तलाठ्याकडे लेखनिकचे काम करणारे बाबासाहेब पोकळे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे.व्यवसाय करत असताना आपली शेती व बेलगावशी असलेले नाळ जोडून ठेवली.बंधू नागेश यानेही समर्थपणे साथ दिली म्हणून बाबासाहेब आणि नागेश या बंधूंना " बेलगाव भूषण " हा पुरस्कार देण्यात आला.बेलगाव येथील सूर्यभान दगडू पोकळे यांच्या कन्या व शाहु महाराज बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थाध्यक्ष प्रमुख सुखदेव पोकळे यांच्या भगिनी सौ.सुनिता दादासाहेब खाडे यांनी १० वर्षे लातूर येथे मुलीमुलाजवळ राहून तिघांनाही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षित केले. आज ही तीनही मुले डॉक्टर असून समाजाची सेवा करीत आहेत.त्यांना माहेरच्यावतीने " आदर्श माता पुरस्कार " देण्यात आला.यावेळी सरपंच तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतीष पोकळे, सेवानिवृत्त कृषी संचालक प्रल्हाद पोकळे,सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन स्वानंद थोरवे सर यांनी तर समन्वयक ॲड.सीताराम पोकळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या