

विशेष लेख
----------
उत्तम बोडखे आष्टी
यशोशिखर गाठताना भक्कम पाया हा आई-वडिलांचे संस्कार असतात!' किंबहुना आईची प्रेरणा
आणि वडिलांचा आशीर्वाद हवा तर पत्नी व मुलांची साथ हवी.आई- वडिलांच्या कष्टाची
जाणीव ठेवून कर्तज्ञतेचा भाव जपावा हे मुलतत्व अंगीकारूण जे आपली जीवनाची वाटचाल
करतात ते जीवनात यशस्वी होतात हा अलिखित संकेत आहे.अगदी याच प्रेरणेतून प्रतिकूल
परिस्थितीत लहानाचे मोठे होत असतात. व्यापक ध्येय ठेवून कार्य कर्तव्य करणारे
कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास यशदायी, प्रेरणादायी
आणि तितकाच थक्क करणारा आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या परळी
तालुक्यातील नाथ्रा येथील रहिवासी आहेत.या छोट्याशा खेडेगावात लहानाचे मोठे होत
असताना प्रचंड स्वप्न आणि ऊर्जा घेत आई-वडील व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या
काकांच्या संस्कारावर त्यांची दमदार वाटचाल होत राहिली.प्राथमिक शिक्षणानंतर
त्यांनी आपली महाविद्यालयाची वाटचाल केल्यानंतर तत्कालीन काळात चळवळीत काम करणाऱ्या
राष्ट्रप्रेम , राष्ट्रभक्ती या विचारसरणीत त्यांनी कार्य सुरू केले. जिद्द,
आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर कार्यकर्ता म्हणून तयार होताना मोठे स्वप्न उरी
बाळगले आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवले.करारी,प्रचंड अभ्यास,आणि अतिशय उत्कृष्ट
वक्ता या गुणांच्या जोरावर राज्य पातळीवरील नेतृत्व म्हणून पुढे आलेले हे युवा नेते
आहेत.धिरोदात्त असलेले हे व्यक्तिमत्व यांनी राज्यमंत्री मंडळतील विविध खाते
सांभाळून आपली चुणुक दाखवली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अतिशय
विश्वासु व निकटवर्तीय म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांची ओळख आहे.परळी
तालुक्यातील विविध डोंगरदर्यातील गाव,वस्ती व वाड्यावर त्यांनी प्राथमिक,
माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढीसाठी मोठे प्रयत्न केलेले
आहेत.त्यामुळे ग्रामीण शेतकरी कामगार ऊसतोड मजुरांची मुले शिकू शकले.पुढे ती
नोकरीला जाऊन स्वावलंबी बनू शकली.शिक्षणाबरोबर त्यांनी सहकार क्षेत्रात यशस्वी
पदार्पण केले.विविध सोसायटी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून
सेवा कार्याला सुरुवात केली. स्वातंत्र्य,समता,बंधुत्व ही मानवी समाजाला संतांनी
शिकवण दिली आहे.संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या पसायदानातून जग सुखी ठेवण्यासाठी दान
मागितल्याचे सर्वश्रुत आहे.आपल्या दैनंदिन जीवन व्यवस्थेमध्ये धनंजय मुंडे यांनी
कष्टातून जी राजकीय प्रगती केली आहे.समाजसेवेसाठी त्यांनी अर्पण केली. छत्रपती
शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेत नुसते बोलके नव्हे किंबहुना कृतीतून कार्य
करणारे सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील नावलौकिक मिळविणारे व्यक्तीमत्व म्हणजे
पालकमंत्री ना.धनंजय मुंडे.... आदर्शवत जीवन जगत धनुभाऊंनी आपली सत्कार्याची दिशा
कायम ठेवली आहे.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःच्या जगण्याचे काय तत्व आहे
यावरूनच त्याचे समाजातील व्यक्तिमत्त्व ठरते. प्रत्येकालाच स्वतःचे एक आपले वेगळे
व्यक्तिमत्व असते ते आपल्या वयाशी किंवा शिक्षणाशी किती सुसंगत आहे.यावरून त्याचे
महत्व ठरते.प्रत्येक स्वतंत्र असलेल्या व्यक्तिमत्वाचा सभोलताच्या
वातावरणावर,समाजावर, कुटुंबावर,मित्रांवर किंवा त्याच्या एकूणच कार्यक्षेत्रात
येणाऱ्या सर्वच घटकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो.आपल्या असामान्य व्यक्तीमत्वाने
समाजात स्वतःचे एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणारे खूप कमी लोक पहायला मिळतात असेच
परळी तालुक्यातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे
पालकमंत्री धनंजय मुंडे. एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण हेरून ते आत्मसात करण्याचा
सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वांपासून प्रेरणा
घेणे,पालकमंत्री धनंजय मुंडे व्यक्ती म्हणून तर सर्वगुणसंपन्न आहेत त्यांची स्वतःची
एक विचारधारा आहे. त्याच्याशी ती कुठल्याही परिस्थितीत तडजोड करत नाहीत.ते राजकीय
क्षेत्रात काम करतात त्यासाठी त्यांचे ध्येय स्पष्ट ठरलेले असते म्हणूनच प्रत्येक
क्षेत्रात यशस्वी होण्याचे त्यांचे ते एक प्रमुख कारण आहे.प्रत्येक ठिकाणी काम करत
असताना त्यासंबंधी सकारात्मक भूमिका ठेवूनच ते वाटचाल करतात. जगाच्या प्रवाहाबरोबर
वाहत राहून कायम स्वकर्तुत्वाला गती देण्याचे काम धनुभाऊ करतात,अखंड क्रियाशील
राहून कामात स्वतःला वाहून घेणे त्यांना आवडते,थांबणे हे त्यांच्या मूळ स्वभावातच
नाही. त्याचे कारण आपली नैसर्गिक रचना ही आपल्याला कायम गतिमान राहण्याचेच शिकवते.
जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा असा राजकीय
प्रवास करणारे ना.धनंजय मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ रोजी झाला. त्यामुळे १५ जुलै
रोजी त्यांचा वाढदिवस असतो.ना. धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद
सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
भाजपमध्ये असतांना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते.त्यानंतर
त्यांची विधान परिषदेवर निवड झाली.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेल्या
ना.धनंजय मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला वेळोवेळी आपल्या आक्रमक
भाषणांनी सळो की पळो केलेले होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्याचे
कृषीमंत्री या महत्वाच्या खात्याच्या मंत्रीपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही
दिले.त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद बीड, परळी नगर परिषद, परळी बाजार समिती
अशा विविध स्तरावर सत्ता आहे.संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक
आहेत.त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे.ना.धनंजय मुंडे यांच्या
वाढदिवसानिमित्ताने हा लेख. कृषी शासनाचा एक विभाग आहे. या विभागाअंतर्गत ग्रामीण
भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम सुरु असते. समाजातील प्रत्येकाला समान
स्वातंत्र्य व समान संधी उपलब्ध करून देणे, आणि योग्य संधीच्या अभावी वर्षानुवर्षे
आर्थिक - सामाजिक उपेक्षेच्या संकटात सापडलेल्यांना झुकते माप देऊन त्यांना
इतरजनांच्या पातळीवर आणणे,हेही न्यायाचेच एक द्योतक होय.असे नेहमीच माननारे
कृषीमंत्री ना.श्री.धनंजय मुंडे आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अंगभूत
नैसर्गिक गुणांच्या आधारावर काही विविक्षित कामे करू शकते. समाजात नवनिर्मितीची
प्रबळ इच्छा असणारा एक उत्पादक - वर्ग,अंगी साहस किंवा शौर्य असणारा एक लढाऊ -
वर्ग,आणि बुद्धी व विवेक असणारा शासक - वर्ग, या तीन वर्गांचे लोक असतात. या
साऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या कामांत हस्तक्षेप न करता आपापली
कामे निष्ठेने करणे हेच न्यायाचे द्योतक होय असे ना.धनंजय मुंडे मानतात. सर्वांना
समान स्वातंत्र्य देणे,आणि समाजातील विषमतेचे योग्य नियोजन करणे,या दोन गोष्टी
न्यायासाठी आवश्यक असतात. सर्वांना केवळ समान संधी देऊन न्याय प्रस्थापित होईलच असे
नाही.समान संधी मिळूनही एखादा वर्ग उपेक्षित राहात असेल तर त्याला थोडे झुकते माप
देणे हे महत्त्वाचे ठरेल.असे ना.श्री.धनंजय मुंडे यांच्या कार्यावरुन लक्षात
आल्याशिवाय रहात नाही. यापुर्वी ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून दिव्यांगसाथी
संकेतस्थळाची निर्मिती,शीघ्र निदान,शीघ्र उपचार उपक्रम, दिव्यांगांसाठी भविष्यात
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र रुग्णालय स्थापन करण्याचा मानस,दिव्यांग अनुदानित
शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ,दिव्यांग
व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोना बाधित असल्यावचे उपचार व लसीकरण या ठिकाणी
प्राधान्य,लाँकडाऊन काळात दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत
सूट,दिव्यांग कर्मचाऱ्यांना वर्क फ्राँम होमची सुविधा,हालचाल न करु शकणाऱ्या
दिव्यांगांना सुविधा, दिव्यांगांना रेशन व आरोग्यविषयक किट, भविष्यात राज्यात
स्वतंत्र दिव्यांग विकास विभाग, तक्रार निवारण कक्ष,संजय गांधी निराधार,श्रावणबाळ
यासह पाच योजनांसाठी निधी मंजूर,६०० रु.वरुन १००० रु.अनुदान वाढ,सहाय्यक तंत्रज्ञान
उपकरणे बाबत शासन निर्णय आदी दिव्यांग हितार्थ निर्णय घेतलेले आहेत.महाराष्ट्र
राज्यातील गरीबांना खऱ्याअर्थाने न्याय देण्याचे काम गोरगरीबांचे भाऊ अर्थात
ना.धनुभाऊ हे रात्रंदिवस काम करतात. राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री
ना.धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक
शुभेच्छा.
----- उत्तम बोडखे
(उपसंपादक)
*******************
0 टिप्पण्या