Ticker

6/recent/ticker-posts

प्रिन्सीपॉल कॉन्क्नेव्ह'मध्ये डॉ.हरिदास विधाते यांचा सहभाग --------------------------------------

आष्टी (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य, प्राध्यापक व अधिकारी यांचेसाठी पुणे येथील ' इन्फोसिस' कंपनीत आयोजित 'प्रिन्सीपॉल कॉन्क्लेव्ह’ संपन्न झाली . यामध्ये आष्टी कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यावस्थापन परिषद सदस्य डॉ.हरिदास विधाते यांनी सहभाग घेतला.केंद्र शासनाच्या 'स्किल इंडिया’ उपक्रमांतर्गत पुणे येथील 'इन्फोसिस आयबीएम लिमिटेड’ या कंपनीच्या भव्य परिसरात हे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ’इन्फोसिस’च्या शालिनी जयकृष्णन,शैली कंभोज व तेजश्री तोडणकर यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनात पुढाकार घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीश काळे यांनी समन्वयकाची भुमिका निभावली.या प्रशिक्षणात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे,डॉ.हरिदास विधाते, डॉ.अरुण दळवे, डॉ.दत्तात्रय वाघ,डॉ. सोपान निंभोरे, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ.चंद्रसेन कोठावळे,डॉ.सी. एम.राव, डॉ.एम. एस.खराटे, डॉ. गोपाळ काकडे, डॉ.लक्ष्मीकांत शिंदे, डॉ.टी.एन. लोखंडे,डॉ.इंद्रजित भगत, डॉ.प्रमोद रोकडे, डॉ.कैलास इंगळे, डॉ.परवेज शेख,डॉ. संजय शिंदे,डॉ.मनोज सोमवंशी,डॉ.कैलास भिसे आदींनी सहभाग घेतला. दोन दिवसात कृत्रिम बुध्दीमत्ता, डिजीटल मार्केटिंग, ग्लोबल बिझनेस, फाऊंडेशन स्किल्स, एसएएमआर मॉडेल,रोल ऑफ लिडरशिप,नॅक पर्टिक्यूलर्स आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास उपस्थित सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या