Ticker

6/recent/ticker-posts

पंकजाताईंना पाहताच वायभासे कुटुंबीयांनी फोडला हंबर्डा.... ...................................... माय- माऊली आल्याचा भास; उपस्थित हजारो जणांच्याही अश्रूंचा बांध फुटला.... .............................. कार्यकर्त्यांनो आत्महत्या थांबवा.... अन्यथा मी राजकारण सोडुन देणार.. ................................... लोकनेत्या पंकजा मुंडेंचा निर्वाणीचा इशारा; अन् ताई ढसाढसा रडल्या .................................. पोपट वायभासेसह चार कार्यकर्त्यांनी ताईंच्या पराभवाच्या धक्क्याने केली आत्महत्या!

उत्तम बोडखे,आष्टी. ------------------------- हिंदुस्तानच्या लोकसभा निवडणुकीत निसटता झालेला पंकजा ताईंचा पराभव अनेकांच्या हृदयाला प्रचंड जिव्हारी लागला.अनेक गावच्या चुली पेटल्या नाहीत.. तर अनेक कार्यकर्त्यांनी अन्न वर्ज केले.. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील तब्बल चार तरुण कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आत्महत्या करून संपवले! या अत्यंत वेदनादायी प्रसंगाने जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेंची कन्या अत्यंत व्यथित होऊन थेट मुंबईहून आज जिल्ह्यात अत्यंत दुःखी अंतकरणाने धावत आल्या.. आणि दुपारी आष्टी तालुक्यातील पोपटच्या घरी धावत गेल्या. जेव्हा ताईंना वायभासे कुटुंबीयांनी पाहिले, तेव्हा अक्षरशः आकाशालाही पाझर फुटावा, एवढ्या प्रचंड गगनभेदी आक्रोश आणि हंबरडा फोडून रडू लागले! अक्षरशः माय माऊली आल्याचा भाष झाला आणि ताई ढसा ढसा रडू लागल्या... हा अत्यंत वेदनादायी भावनिक प्रसंग पाहताना अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक महिला भगिनी आणि युवा कार्यकर्त्यांनाही अक्षरशः आपल्या डोळ्यातील आश्रूंचा फुटलेला बांध आवरता आला नाही.... बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपट वायभासे या तरुणाने आत्महत्या केली.लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे आज दुपारी सांत्वन केले, कुटुंबातील हे दुःख आणि वेदना पाहून अक्षरशः पंकजाताई मुंडे या धाय मोकलुन रडल्या.निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात; मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे.कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे.त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावा. कोणतीही निवडणूक अंतिम नसते.कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान, मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या जबाबदारी आपण घेऊ... असे म्हणत आधार व धीर दिला.राजकारणात जय-पराजय होतच असतो.मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका, अशी मी कळकळीची विनंती करते.. असं पंकजा मुंडे यांनी म्हटले.बीड लोकसभा मतदार संघात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात चौघांनी आत्महत्या केल्या. यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांच्या कुटुंबाला लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी भेट दिली.यावेळी कुटुंबियांना आधार व धीर देताना पंकजाताई मुंडे या ढसढसा रडल्या.यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनो आत्महत्या थांबवा.... अन्यथा मी राजकारण सोडुन देईल...आता आत्महत्या करू नका.मला लढण्यासाठी बळ द्या.आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल असही लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं. आत्महत्यांच्या घटनाने मी खूप अस्वस्थ होते.माझ्या प्रकृतीवर देखील परिणाम झालाय. मी शब्दांत सांगु शकत नाही. मी कधीही कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही.मी त्यांना नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्य मानलं. त्यांना मी जीव लावला.माझा पराभव झाला म्हणून हे लोक जीव देत आहेत.हे मला अजिबात मान्य नाही.मागील १० वर्षांपासून मी राजकारणात आहे.मी कधीही स्वत:चं संतुलन बिघडू दिलं नाही. मात्र या घटनांमुळे कमकुवत झाले आहे.मला खूप अपराधी वाटतंय.कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही, असं लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांअत्यंत भावनिक आणि वेदनामुळे अंतकरणाने भावना दिवस होताना म्हणाल्या. यावेळी आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे , बबनआण्णा झांबरे, विजय गोल्हार, विष्णूपंत वायभासे, प्राचार्य डाॕ.कैलास वायभासे,माजी सभापती अशोक ईथापे, युवराज वायभासे, प्रदीप वायभासे,सचिन वायेभासे, सचिन घुले, विलास वायभासे,संदीप नागरगोजे, सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते. चौकट --------- नेत्यासाठी कार्यकर्त्यांच्या चार आत्महत्या; राज्य हादरले! ------------------------------ हिंदुस्तानचे माजी ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी प्रचंड माणसांची श्रीमंती कमावली. त्यांच्याच कन्या पंकजाताई मुंडे विचार पुढे घेऊन चालल्या. परंतु दुर्दैवाने अल्पशा मताने पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांना दुःख असह्य झाले.तब्बल बीड जिल्ह्यात चार आत्महत्या झाल्या. नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट जीव देण्याची हिंदुस्तानमधील दुर्मिळ घटना असून या घटनेने बीड जिल्हा सह महाराष्ट्र आणि संपूर्ण देश हादरला आहे. ------------------------------- आमच्यासाठी अपराधीपणाची भावना; जय-पराजय संयमाने घ्या! ------------------------------ मी कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवले. त्यामुळे मुंडे घराण्याविषयी प्रचंड आपलेपणाची भावना राहिली.याच जिव्हाळा आणि आत्महत्या च्या भावनेतून माझा पराभव असह्य झाल्याने आपण आत्महत्या करत आहात.. हे आमच्यासाठी अपराधीपणाचे असून जय पराजय संयमाने घ्या असे सबुरीचे आवाहन त्यांनी केले. ----------------------------- वायभासेंच्या चिमुकल्यांची जबाबदारी घेतली.. -------------------------- मयत पोपट वायभासे यास पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोपट वायभासे गेल्यानंतर हे कुटुंब सावरण्यासाठी खुद्द पंकजाताईंनी या चिमुकल्यांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेत असल्याचे अत्यंत उद्विग्नपणे सांगितले आणि या कुटुंबाला धीर आणि आधार दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या