
आष्टी (प्रतिनिधी)
आदर्श शिक्षक हा त्या खेड्याचा आदर्श समाजसेवक असतो; किंबहुना शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे, असे सांगत घाटशीळा विद्यालय हे बीड जिल्ह्यातील गुणवत्तेचा आदर्श पॅटर्न निर्माण करा असे आवाहन प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक तथा शिक्षण व सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी केले.
प्रगति शिक्षण प्रसारक मंडळ बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील घाटशीळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी संस्थेतील ज्येष्ठ अभ्यासू शिक्षक श्रीकांत वारभुवन यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पदग्रहण करताना रामकृष्ण बांगर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.मंचावर पाटोदा सेवा सहकारी सोसायटीचे संचालक बापूरावजी घुमरे, प्रा.शांतीलाल जायभाये, नूतन मुख्याध्यापक श्रीकांत वारभुवन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत भगवान बाबा यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.शिक्षण महर्षी रामकृष्ण बांगर पुढे म्हणाले, घाटशीळा विद्यालयातून विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर प्रशासनातल्या विविध क्षेत्रात यशस्वी झाले पाहिजेत.डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, पोलीस अधिकारी आदी सह उच्च पदावर जाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेतली पाहिजे.विद्यार्थ्यांच्या अध्यापना विषयी गोडी निर्माण करणे,अधिकच्या तासिका, शिस्त, संस्कार, क्रीडा सांस्कृतिक व सर्वांगीण विकासासाठी लक्ष देण्याचे आवाहन करून विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.घाटशिळा विद्यालयाचे शिक्षक हे उच्च गुणवत्ताधारक आणि कार्यक्षम असून येथील विद्यार्थ्यांच्या मध्ये परिश्रमपूर्वक ज्ञान निर्मिती करणे हे आव्हान आहे असे ते म्हणाले.श्रीकांत वारभुवन यांच्या नियोजनातून शाळेची गुणवत्ता वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी ज्येष्ठ शिक्षक बडे सर, ढाकणे सर, घुगे सर, प्रा.बटुळे सर, एन.एस. सानप, आर.के. खेडकर, परजने सर, गोरख बांगर, आजिनाथ शिरसाट, हांगे,पाखरे आदी सह कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा.बी.के. मुंडे यांनी; तर सूत्रसंचालन निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांनी केले. आभार डी.एस.तळेकर यांनी मानले.
चौकट
---------
श्रीकांत वारभुवनन
कार्यक्षम शिक्षक!
--------------------------
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुणवंत ज्येष्ठ आणि अभ्यासू शिक्षकांना मानसन्मान दिला जातो.शासन नियमांचा भाग आणि श्रीकांत वारभुवन यांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता लक्षात घेत संस्थेने मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी नियुक्ती केली त्याबद्दल अभिनंदन करून त्यांनी घाटशीळा विद्यालयाच्या भविष्यातील गुणवत्तेसाठी परिश्रम घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जरेवाडी, प्रगतीसारखा
पॅटर्न राबवा!
------------------------------
शिक्षणाच्या गुणवत्ता क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या पाटोदा तालुक्यातील जरेवाडी मॉडेल स्कूल तसेच बीड येथील प्रगती विद्यालया सारखा व उच्च गुणवत्तेचा उत्कृष्ट पॅटर्न तयार करा,मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास यावेळी रामकृष्ण बांगर यांनी दिला.
----------------------------------------
0 टिप्पण्या