आष्टी (प्रतिनिधी)
आतापर्यंत ओबीसी, एनटी, एसबीसी प्रर्वगातील विद्यार्थ्याना
नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नव्हती.यासाठी संघटना सतत प्रयत्नशील
होती. यासाठी नागपूर अधिवेशनात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे
यांनी बैठक घेतली आणि गेल्या मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी
ही मागणी लावून धरली आणि वित्तमंत्र्यांनी याला विशेष बाब म्हणून मान्यता दिली
आहे.मराठवाडयातील गेल्या १५ वर्षांपासून धनगर,वंजारी,बंजारा, नाव्ही, सुतार, कुंभार
आदि प्रवर्गातील विद्यार्थीनी एएनएम व जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमापासून वंचित राहत
होते.त्यांना या माध्यमातुन न्याय मिळाला आहे.त्यांचा या क्षेत्रात कमी झालेला
शिक्षणाचा टक्का या माध्यमातून वाढण्यास मदत होणार आहे.राज्यातील या अभ्यासक्रमास
विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रर्वगातील
विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती लागु करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण
विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे खाजगी नर्सिंग स्कुल व कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे
अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार व संघटनेचे पदाधिकारी,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष
डाॕ,शिवाजी राऊत व सभासदांच्यावतीने तसेच महाराष्ट्रातील अनेक नर्सिंग स्कुल अँड
कॉलेजच्या संस्थाचालक यांच्या वतीने यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.संघटनेचे
अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांनी वेळोवेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री
अतुल सावे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदने देऊन महाराष्ट्र राज्यात
विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवंगातील
विद्यार्थ्यांना एएनएम व जीएनएम नर्सिंग या अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती लागू करण्यात
यावी अशी मागणी केली होती व त्या मागणीला यश मिळालेले आहे असेही डाॕ.राऊत म्हणाले.
0 टिप्पण्या