



आष्टी (प्रतिनिधी)
पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे जाणीपूर्वक लक्ष ठेवून त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.सध्याच्या काळात क्रिडा क्षेत्राला (खेळाला) भरपूर महत्त्व आलेले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे अशांनी खेळाकडे वळावे.
शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रिडा क्षेत्रातही नाव कमवा तिकडे ही स्कोप आहे.दिवसेंदिवस शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळांची गुणवत्ता वाढत चालली आहे.विद्यार्थ्यांनी आतापासून पुढच्या शिक्षणाची चांगली तयारी करावी आपल्याला काय व्हायचे ते आत्ताच ठरवावे. खेळाकडे लक्ष द्यावे.खेळामुळे देखील नोकरीत भरपुर संधी आहेत सकाळी उठून अभ्यास करावा, व्यायाम करावा.जिवनात सुखाचे दिवस पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले कष्ट करावे मन लावुन अभ्यास करावा.भावी जीवनात चांगले काम करावे. मुख्याध्यापकांनी गुणवत्ता व निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नाव कमवा तिकडे ही स्कोप असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्था,आनंद चॅरिटेबल संस्था, छत्रपती शाहु एज्युकेशन सोसायटी व किसान शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. कडा येथे संपन्न झालेल्या गुणवंत सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे होते.याप्रसंगी व्यासपीठावर युवा नेते तथा विद्यापीठ सिनेट सदस्य डाॕ.अजय धोंडे,उद्योगपती बापुसाहेब डोके,पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर,अभय धोंडे, विठ्ठलराव बनसोडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,
ह.भ.प.पांडुरंग महाराज कर्डिले,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख,सय्यद रज्जाक,
छबु देवकर,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तथा सिनेट व ॲकेडेमिक कौन्सिल मेंबर प्राचार्य डॉ.हरिदास विधाते म्हणाले की,४० वर्षांपुर्वी तालुक्यात मोजक्या शाळा होत्या परंतु माजी आ.भीमराव धोंडे यांनी आमदार झाल्यानंतर रुईनालकोल येथे पहिली शाळा सुरू केली.हळुहळु तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये सुरु करुन शिक्षणाची सोय केलेली आहे.आजचा २६ वा. सत्कार समारंभ आहे.गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता अशाच प्रकारे जोपासावी. प्रत्येक वर्षी कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला जातो.गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.संस्थेमधील २० विद्यालयांचा १० वी.
चा १०० टक्के लागला त्याबद्दल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी स्व.आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी यांच्या पुतळ्यास माजी आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उद्योगपती बापुसाहेब डोके यांनी सांगितले की,४० वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यात शिक्षणाची सोय नव्हती. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले पालक आपल्या पाल्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवत होते परंतु गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हते.माजी आ.भीमराव धोंडे यांच्यामुळे गावागावात शिक्षणाची सोय झालेली आहे.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय आपापल्या गावातच झालेली आहे.दहावी बारावीची गुणवत्ता वाढत चालली आहे.विद्यार्थ्यांनी यापुढेही असाच अभ्यास करीत गुणवत्ता टिकवून ठेवावी.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे कौतुकाची थाप आहे.पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त केले आहेत.भविष्यात चांगले उच्च शिक्षण घेऊन भारताचे चांगले नागरिक बनावे.मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा.पालकांनी लहान मुलांना दुचाकी चारचाकी चालवण्यासाठी देऊ नये. सामाजिक माध्यमांचा योग्य कामासाठी वापर करावा.संस्थेमधून प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या हर्षदा सुरवसे, शेख महंमद, सारीका टकले यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार व ४ हजार रुपयांचे बक्षीस देऊन संस्था अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, बापुसाहेब डोके,
अजयदादा धोंडे, पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तालुक्यात १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या जि.प.शाळा आष्टीच्या कु.आर्या खताळ या विद्यार्थ्यीनीचा सत्कार करण्यात आला.निट व जेईई परिक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी. राऊत,प्रा.
शिवदास विधाते,माऊली बोडखे,दत्तात्रय गिलचे,
संजय शेंडे,उपप्राचार्य डॉ.बापु खैरे,उपप्राचार्य डॉ.संभाजी वाघुले,विविध शाळेचे मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी,पालक उपस्थित होते.याप्रसंगी माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की,
विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशाकडे वळण्यापेक्षा आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे तसेच स्पर्धा परीक्षेकडे वळावे व शाळेबरोबर आई वडिलांचा नावलौकीक करावा असे सांगीतले.यावेळी कडा येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयातून ॲग्री विषयात १०० टक्के गुण घेणा-या (पैकीच्या पैकी गुण) मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.विद्यार्थी यादी वाचन उपप्राचार्य डॉ.संभाजी वाघुले,प्रा.
डॉ.संभाजी ओव्हाळ यांनी केले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.डॉ.जी.
पी.बोडखे,सूत्रसंचालन प्रा.शैलजा कुचेकर यांनी तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.बापू खैरे यांनी मानले.
0 टिप्पण्या