Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी पत्रकार बांधवांचा महाबळेश्वरसह ऐतिहासिक स्थळ आणि देवदेवतांचा दर्शन सोहळा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी ) लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांची लेखणी सातत्याने समाज हिताच्या दृष्टीने सुख, दुःख समाधान होऊन आपले कर्तव्य निभावत असते परंतु हे कर्तव्य करत असताना थकून भागून गेलेल्या जीवाला सीन हलका व्हावा आणि जगातील वेगवेगळ्या भागातील नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांचा सहभाग लाभावा.या दृष्टिकोनातून आष्टी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी नुकताच हा ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योग एका सहलीच्या माध्यमातून आणला आहे.आष्टी येथील पत्रकारांची लेखणी सर्वाधिक व्यापक आणि विस्तृत स्वरूपात व्यक्त झालेली सर्वश्रुत आहे.राजकारण,समाजकारण,संस्कृती, धर्मशिक्षण आदीसह विविध क्षेत्रातील संशोधनात्मक बातम्या आणि लेख लिहिण्याची एक वेगळी चळवळ या पत्रकारांच्या वैशिष्ट्यांचा भाग आहे.विविध दैनिक,साप्ताहिक तसेच वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या रूपातून तालुक्याच्या विविध भागातील दर्शन यानिमित्ताने सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार सदैव पुढे आहे.दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीच्या अनुषंगाने आष्टी येथील पत्रकार दत्ताभाऊ काकडे,उत्तम बोडखे, भीमराव गुरव,प्रवीण पोकळे,शरद तळेकर, संतोष सानप, रघुनाथ कर्डीले,शरद रेडेकर,गणेश दळवी, सचिन रानडे, मनोज पोकळे या पत्रकारांनी आपल्या देशाच्या छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजीराजे यांनी घडवलेल्या किल्ल्यांच्या अभ्यास करण्यासाठी तसेच देव देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वादासाठी त्यांनी सहलीचे आयोजन केले. आष्टीचे पत्रकारांची ही सहल महाबळेश्वर, तापोळा (मिनी काश्मीर),मांढरादेवी, वाईचा नवसाचा गणपती, पाचगणी येथील स्टाॕबरी बगांची पाहाणी,मॕप्रो कंपनीला भेट सातारा अजिंक्यतारा किल्ला दर्शन असा दौरा (सहल) पुर्ण करुन परतेल अशी माहिती महाबळेश्वर येथून ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी दिली. ***************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या