आष्टी ( प्रतिनिधी)
आष्टी येथील समर्थ देवरे आणि समृद्धी देवरे या भावंडानी
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत यश मिळवले आहे.वैद्यकीय शिक्षण प्रवेशसाठी
घेतल्या जाणाऱ्या नीट एजी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.आष्टी येथील रहिवासी
असलेले आणि ठिबक सिंचन क्षेत्रात नावलौकिक असलेले भैरवनाथ देवरे यांच्या मुलाने आणि
मुलीने या परीक्षेत यश मिळवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस
अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.समर्थ भैरवनाथ देवरे यांने या
परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण मिळवले तर समृद्धी भैरवनाथ देवरे या त्याच्या बहिणीने
७२० पैकी ६०९ गुण मिळवले.दोघांचेही दहावीपर्यंतचे शिक्षण आष्टी येथील वसुंधरा
विद्यालयात झाले आहे. या दोघांच्या यशाबद्दल आष्टीकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या