Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे .................... लालासाहेब कुमकर

आष्टी (प्रतिनिधी) स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सुकन्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या कालावधीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालासाहेब कुमकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे ईमेल द्वारे विनंती केली आहे या विनंती पत्रामध्ये लालासाहेब कुमकर यांनी म्हटले आहे की,भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रामध्ये कमी संख्येने खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे यापुढे भारतीय जनता महाराष्ट्र राज्यातील जनतेमध्ये प्रभावी रीतीने करता यावा यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वारसदार असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी राज्यातील महायुतीच्या कालावधीमध्ये ग्रामीण विकास विभागामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करून आपल्या कामाचा ठसा उमदवलेला आहे मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी चे सरकार केंद्रा शासनामध्ये स्थापन होऊन मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. त्यावेळी लातूर मतदार संघामध्ये पराभूत होऊन देखील शिवराज पाटील चाकूरकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून त्यांना केंद्रीय गृहमंत्री पद देण्यात आले होते अशा पद्धतीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या पीछेहाटीवर प्रभावी उपाययोजना म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कामाचा ठसा उमटवा यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचा मराठवाड्याचा आणि बीड जिल्ह्याचा विकास पूर्ववत वेगाने व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा असेही विनंती पत्रामध्ये म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या