Ticker

6/recent/ticker-posts

चिंचेवाडीच्या स्व.पोपट वायभासे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार .............................. पालकमंत्री धनंजय मुंडे

आष्टी (प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपनेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे.कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत.कोणतीही निवडणूक अंतिम नसते.कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात येत आहे.यावेळी शिवा शेकडे, सुधीरभाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायेभासे, सचिन घुले, प्राचार्य कैलास वायभासे,विलास वायभासे, युवराज वायभासे ,देवळलीचे सरपंच पोपट शेकडे,गंगादेवीचे सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या