Ticker

6/recent/ticker-posts

प्राध्यापकांच्या ज्ञानाचा समाज व्यवस्थेला फायदा व्हावा .................. माजी आ.भीमराव धोंडे ................................ प्रा.डॉ.गुलाबराव मंडलीक यांचा सेवापुर्ती सोहळा थाटात संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) 'शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. प्राध्यापक शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी युवक आणि तरुणांना सुसंस्कृत करून समाजाचा एक सक्षम नागरिक घडवण्याचे मौलिक कार्य घडते असे सांगत प्राध्यापक बांधवांनी सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरही आपल्या ज्ञानाचा मानवी समाज व्यवस्थेला फायदा व्हावा असे जीवन जगावे अशी अपेक्षा आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांनी व्यक्त केली. आष्टी येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात गेल्या ३५ वर्षाहून अधिक सेवा कार्य अत्यंत सक्षम आणि प्रामाणिकपणे निभावल्या नंतर आज सेवानिवृत्तीचा समारंभ प्रा.डॉ. गुलाबराव मंडलिक आणि त्यांच्या सौभाग्यवतीचा सपत्नीक सत्कार माजी आ. भीमराव धोंडे आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळेस ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, प्राचार्य डॉ चंद्रकांत मंडलीक, प्राचार्य महादेव दानवे,प्राचार्य अशोक गदादे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.ताजने, एकनाथ मंडलीक,दिपक गरुड, काशिनाथ कर्डीले,सोनटक्के इतर मान्यवर उपस्थित होते. आष्टी येथील कै.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,माता जिजाऊ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर,कै.आनंदराव धोंडे यांना अभिवादन करण्यात आले. ३५ वर्षाहून अधिक वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणाऱ्या डॉ. गुलाबराव मंडलिक आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून आणि ग्रंथ भेट देत यथोचित सन्मान केला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या जोडीचे स्वागत केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष व माजी आ.भीमराव धोंडे हे होते. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की,जगात सर्वात जास्त हिंदी भाषा बोलतात, हिंदीला महत्त्व आहे. सर्व देशांतील प्रांतात बोलली जाते. सेवानिवृत्ती नंतर आपल्या विषयात संशोधन करावे आपल्या नंतर लोकांनी वाचाले पाहिजे.संस्थेत १०० पीएच.डी.आहेत. प्राध्यापकांच्या मुलेमुली उच्च अशा विविध पदांवर का जात नाहीत ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या पश्चात समाजाने आपले नाव काढले पाहिजे असे काम करावे. आपल्या संशोधनाचा समाजाला फायदा व्हायला हवा . गुणवत्ता निर्माण केली पाहिजे.प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागली पाहिजे अशी गुणवत्ता महाविद्यालयाने निर्माण करावी.खाजगी क्लासेस लावुन विद्यार्थ्यांना समाजात जगण्याचे ज्ञांन मिळत नाही.यावेळी प्रस्ताविक आनंदराव धोंडे महाविद्यालये प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांनी करताना मंडलीक सर यांचा जीवन प्रवास कथन केला.सहकारी सेवानिवृत्त होत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत सद् गदीत अंतकरणाने भावना व्यक्त केल्या.यावेळी प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक यांनी प्रा.डॉ. गुलाबराव मंडलिक यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि युवकांमध्ये हिंदी भाषेची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले त्यांनी महाविद्यालयाच्या एकूण बौद्धिक विकासासाठी प्रमाणिक प्रयत्न केले त्यांनी केलेले कार्य आणि अत्यंत तत्पर सेवा येथील प्राध्यापक बांधवांना कायम प्रेरणास्थानी राहील. सेवापूर्ती निमित्त सत्काराला उत्तर देताना निवृत्त प्राध्यापक डॉ.गुलाबराव मंडलिक यांनी अत्यंत निस्पृह आणि मनोभावे आपल्या भावना अत्यंत सद्गतीत स्वरात व्यक्त केल्या. माजी आ.भीमराव धोंडे यांनी संस्था चालक म्हणून केलेले आजपर्यंतचे मार्गदर्शन, त्यांचा स्वभाव,युवक आणि आष्टी तालुक्यातील त्यांनी केलेला शिक्षण प्रसार खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला एक अत्यंत महत्त्वाची कलाटणी देणारा ठरला!' असा गौरव करून या संस्थेचे उपकार आयुष्यभर राहतील हा प्रमाणिक भाव त्यांनी व्यक्त केला.या अत्यंत बहारदार सेवापूर्ती समारंभाचे सुत्रसंचलन प्रा.शैलजा कुचेकर यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार प्रा.पटेल यांनी मानले. चौकट --------- हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी साडेतीन दशके योगदान! ------------------------------ आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी वरिष्ठ महाविद्यालय हिंदी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या प्रा.डॉ. गुलाबराव मंडलिक यांनी हिंदी हे राष्ट्रभाषा असून तिच्या संवर्धनासाठी आजच्या युवा पिढीमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध शिबिरे कार्यशाळा चर्चासत्रे स्पर्धा निबंध वक्तृत्व आदीसह राज्याच्या अनेक महाविद्यालयांमध्ये सहभाग घेत शोधनिबंध आणि संशोधन करून मोठे योगदान दिले.त्यांचा हा सेवापूर्ती समारंभ भविष्यातील तरुणाईला भाषेची आवड निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या