
आष्टी(प्रतिनिधी )
आष्टी पंचायत समितीसमोर बीडसांगवी येथील विजय डुकरे,गोकुळ नरवडे,
सोमीनाथ करडुळे,माणिक नरवडे यांनी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी
या मागणीसाठी अमरण उपोषण सुरु केले होते.उपोषणाच्या दुसऱ्या गटविकास आधिकारी
राजेंद्र गर्जे यांनी सात दिवसाचे आत चौकशी करु असे लेखी आश्वासन दिल्याने
बीडसांगवीकरांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. युवानेते जयदत्त धस यांच्या उपस्थितीत
हे उपोषण सोडविण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील बीडसांगवी
येथील ग्रामपंचायतमध्ये १५ व्या.वित्त आयोग व ईतर योजनांतुन केलेल्या कामांची
माहिती न दिल्यामुळे गोकुळ नरवडे,सोमनाथ करडूळे,माणिक नरवडे आणि विजय डुकरे हे
आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार दि.२४ जुन रोजीपासुन अमरण उपोषण सुरु केले
होते.पहिल्या दिवशी या उपोषणाची अधिका-यांनी दखल घेतली
नाही.जिल्हाधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी,तहसिदार यांना निवेदन दिले
होते.ग्रामपंचायत बीडसांगवी येथे १५ व्या.वित्त आयोग व इतर योजनेमधून बोगस केलेल्या
कामाची माहिती मागीतली असता ग्रामसेवक वारंवार उडावा उडवीचे उत्तरे
देतात.ग्रामपंचायत बीडसागवी येथील बोगस केलेल्या कामाची चौकशी करुन कार्यवाही
करण्यात यावी.ग्रामसेवक गावात कधीही येत नाहीत.मासिक मिटिंग, ग्रामसभा हे गावात घेत
नाहीत.जर घेत असतील तर फक्त कागदोपत्री घेतात.त्यामुळे येथे भ्रष्टाचार झाला
आहे.संबधित ग्रामसेवक व ज्याच्या साहाय्याने अर्थिक व्यवहार झाला आहे.त्यांच्यावर
तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ग्रामसेवक यांना बडतर्फ करावे यामागणीसाठी आष्टी
पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले होते. उपोषणकर्ते गोकुळ सुभाष नरवडे
व इतर रा. बीडसांगवी यांचे दि.२० जुन २०२४ राजांच्या निवेदनाचे अनुषंगाने सविस्तर
चौकशी करून चौकशी अहवाल सात दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावा.या प्रकरणात पुढील
योग्य ती कार्यवाही करणे सुलभ होईल. याकामी विलंब अथवा दिरंगाई होणार नाही याची
दक्षता घ्यावी असे गटविकास अधिकारी वर्ग १ राजेंद्र गर्जे यांनी लेखी पत्रात म्हटले
आहे.
0 टिप्पण्या