

आष्टी (प्रतिनिधी)
कालपासून आष्टी शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस मांडला
आहे.सोमवार दि.२४ जुन रोजी सायंकाळी अहमदनगर-बीड मार्गावर असलेल्या एका वॉशिंग
सेंटर येथे काम करणाऱ्या मुस्तफा सय्यद नावाच्या व्यक्तीला या पिसाळलेल्या
कुत्र्याने सर्वात प्रथम चावा घेतला. यानंतर बस स्थानक परिसरात येऊन तेथील दोन
प्रवाशांना तर पुढे मानवी वसाहत असलेल्या संजीर बावरे, बाबासाहेब चव्हाण, आदित्य
गिऱ्हे,नामक इसमाला या पिसाळलेल्या कुत्र्याने जबर चावा घेतला असल्याची घटना घडली
आहे. तांबड्या रंगाच्या कुत्र्याने सहा लोकांना जबर चावा घेतला आहे. आष्टी शहरातील
विविध ठिकाणी या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेऊन बाधित केले आहे.घटनेची
माहिती समजताच नगरसेवक नाजीम शेख यांनी काल रात्री बाधित रुग्णांवर आष्टी ग्रामीण
रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर
जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.
नगरसेवक नाजीम शेख यांची सतर्कता
-----------------
काल रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने सर्वात प्रथम चावा घेतलेल्या
मुस्तफा शेख यांनी घटनेची माहिती नगरसेवक नाजीम शेख यांना दिली असता नाजीम शेख
यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्याने नागरिक सतर्क झाले.
0 टिप्पण्या