Ticker

6/recent/ticker-posts

प्रपंच हा शरीर धर्मासाठी तर परमार्थ मनाच्या शुद्धतेसाठी! .............................. ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले ................................. माऊलीनगर येथे ज्ञानेश्वरी पारायण,संगीत रामायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

आष्टी (उत्तम बोडखे) ,
कोणताही खेळ खेळताना गडी शोधून निवडले पाहिजेत. जर गडी चुकीचे निवडले की सरकारसुद्धा पडतंय.. त्यामुळे खेळ खेळताना गडी पाहूनच निवडले पाहीजेत.सुख दुःख पेलण्याची ताकद ज्या व्यक्तीत असते.ज्याने आपल्या आयुष्यात खूप काही सहन केले तोच यशस्वी होत असतो.जीवनात धाडस महत्वाचे आहे.जे व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या वाटेवर अडथळा करतात त्या व्यक्तीला बाजूला ठेवा.तुमच्या साधनेला जे आडवे येतात असा गोष्टी जवळ नसाव्यात.आष्टी शहरातील हा माऊलीचा पुण्यतिथीनिमित्त सप्ताह नसून हे अध्यात्मिक अधेवशन किंवा लोकोत्सव आहे असे म्हटल्यास. वावगे ठरणार नाही.आष्टी शहरातील पत्रकारांचे तर विशेष आभार मानतो कारण अध्यात्मिक क्षेत्रातील या धार्मिक उत्सवाला खुप मोठी प्रसिद्धी त्यांनी दिली.प्रपंच हा शरीर धर्मासाठी तर परमार्थ हा मनाच्या शुद्धतेसाठी असतो!" असे प्रतिपादन अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी केले. आष्टी येथील माऊलीनगरात संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे २४ व्या.पुण्यतिथीनिमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अ.भा. वारकरी मंडळाचे प्रेरणाने ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम सप्ताह व संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा झाला.काल्याचे कीर्तनात बोधले महाराज बोलत होते.यावेळी अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले आणि ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांचा माऊली सेवा मंडळाचे वतीने सत्कार केला.काल्याचे कीर्तनास आ.बाळासाहेब आजबे,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,सौ.दमयंतीताई धोंडे,युवा नेते जयदत्त धस,समजसेवक विजय गोल्हार,सतीषआबा शिंदे,डाॕ.शिवाजी राऊत,चेअरमन आदिनाथ सानप, अशोक मुळे, सरपंच सौ.शालनताई मुळे, दिनकरराव तांदळे,राजेंद्र धोंडे, विठ्ठलराव बन्सोडे,सदानंद तुपे,इंजि.पी. बी.बोडखे,भाऊसाहेब लटपटे,बलभीम सुंबरे,माजी सरपंच आदिकाताई लोखंडे ,हौसराव आजबे,प्राचार्य डाॕ.चंद्रकांत गोसावी,डी.ए.निंबाळकर,प्रा.महेश चवरे, कपीलशेठ अग्रवाल,आबा गांगर्डे आदि मान्यवर उपस्थित होते. चौकट -------- धार्मिक क्षेत्रातही महाराष्ट्राची आघाडी -------------------------------- महाराष्ट्राइतके साधुसंत इतर कुठल्याही भूमीत नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच प्रत्येक गोष्टीवर आघाडीवर आहे.धार्मिक क्षेत्रामध्येसुद्धा महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे.ज्या भागात जी गोष्ट जास्त उपलब्ध असते त्या गोष्टीवरून तो भाग ओळखला जातो.महाराष्ट्राची ओळख म्हणजे संत परंपरा आहे. महाराष्ट्रातील असा एकही भाग नाही की जेथे संत नाहीत असेही बोधले महाराज यावेळी म्हणाले. चौकट ----------- संत वचनाप्रमाणे वागा! -------------------------------- माणसाच्या मनातील विषय वासना समूळ नष्ट करायच्या असतील तर संत साहित्याचा आधार घेऊन संत वचनाप्रमाणे प्रत्यक्ष वागलं पाहिजे. प्रत्येक संत वचनाला,संताच्या पायाखालील धूळ कण म्हणतात.संसार किंवा प्रपंच हा शरीर धर्मासाठी असतो तर परमार्थ हा मनाच्या शुद्धतेसाठी असतो. दोन्हीमध्ये गफलता न करता संत वचनाच्या सानिध्यात राहून स्वतःचे कल्याण साधावे असे सांगत कीर्तनासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजांचा 'संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय' हा अभंग निवडला होता.अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये व ग्रामीण भाषेमध्ये त्यांनी उपस्थितांना प्रबोधित केले.संत साहित्याचे अनेक अर्थ असतात त्यामुळे फक्त शब्दावर न जाता त्याचा नीट भाव समजून घेतला पाहिजे. आष्टी शहरातील माऊली नगरात माऊली मंदिरात माऊली सेवा मंडळाच्या वतीने २० व्या. शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे २४ व्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण कथा व ग्रंथराज ज्ञाने श्वरी पारायण सोहळानिमित्ताने काल्याच्या कीर्तनात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी केले.यावेळी माऊली सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य राजकीय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक,व्यापार,पत्रकार क्षेत्रातील मान्यवर व हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.यावेळी अनेकांचा माऊली चाकरवाडीकर यांच्या प्रतिमा देत गौरव करण्यात आला. उपस्थितांचे माऊली सेवा मंडळाचे सदस्य तथा अ.भा.वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.दिनकरराव तांदळे यांनी आभार मानले. चौकट ----------- पत्रकारांना विशेष धन्यवाद! --------------------------------- अध्यात्मिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी देऊन समाजामध्ये समतोल राखण्याचे मौल्यवान कार्य वृत्तपत्र आणि माध्यमिक क्षेत्र करतात. या अनुषंगाने आष्टी शहर आणि तालुक्यातील पत्रकार बांधवांनी गेल्या आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनकार प्रवचनकार यांच्या संत विचारांच्या वाणीतील शब्दांना प्रसिद्धी देऊन मौलिक कर्तव्य बजावले !'अशा शब्दात त्यांनी पत्रकार बांधवांना विशेष धन्यवाद दिले. ------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या