Ticker

6/recent/ticker-posts

सेवेकडे तन,भगवंताकडे मन आणि अन्नदानाकडे धन लावणारे संत माऊली चाकरवाडीकर होते ........................ ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु

आष्टी (प्रतिनिधी) अज्ञानाचे आवरण घालविण्यासाठी संत येतात.सामान्य कर्तव्य म्हणजे स्वाभिमानाने जगण्यासाठी पैशाची प्राप्ती,विशेष कर्तव्य पुण्यप्राप्ती आणि पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. ज्यांच्या अंतकरणात सतत भगवंताची आठवण असते त्यांच्याजवळच दया असते. तन,मन,धन या तिन्ही गोष्टीचा जो कोणी सदुपयोग करीन त्याचा इतिहास होतो.सेवेकडे तन,भगवंताकडे मन आणि अन्नदानाकडे धन लावणारे संत माऊली चाकरवाडीकर होते असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु यांनी केले. आष्टी येथील माऊली नगरात २० व्या.शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे २४ व्या.पुण्यतिथीनिमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अ.भा.वारकरी मंडळाचे प्रेरणाने ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम सप्ताह व संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरु आहे.या सप्ताहात कीर्तन सेवेत रामकृष्ण रंधवे बापु बोलत होते. यावेळी ह.भ.प. निवृत्तीदादा बोडखे, ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज,ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे,राजेंद्र धोंडे, आदिनाथ सानप, बलभीमराव सुंबरे, देवीदास चाळक, दिनकरराव तांदळे,गोविंद महाराज पवार, बाबासाहेब शिंदे, हनुमान महाराज येवले,अनिल महाराज गरुड,देविदास बर्डे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच परिवंत गायकवाड,अशोक बळे,बबन बळे,प्रा. सुभाष रासकर,ओम महाराज नन्नवरे, तुकाराम महाराज भोसले,रविंद्र तवले,दत्तात्रय निंबाळकर,प्राचार्य के.बी.खाडे,ह.भ.प. अशोक डोके महाराज, नानासाहेब तवले, हौसराव आजबे,अवधूत आवारे,ज्ञानेश्वरी केरुळकर,भाऊसाहेब कोकणे,तुळशीराम चटाले,पिराजी तवले, डोमकावळे महाराज उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू पुढे म्हणाले की,समाजात मानव, संत,भगवंत हा तीन वर्ग आहेत.जीव दशेतील मानव हा सुखाच्या, आनंदाच्या शोधात आहे.संत जीवनात सदानंद असतो.भगवंत हा सचिदानंद स्वरुप आहे.देव म्हणजे आनंद आहे.देवाचे दुसरे नाव आनंद ...देव हा व्यक्ती नसुन एक शक्ती आहे.मनासाठी परमार्थ आहे.मनाचे दारिद्रय सदानाम घोष करणे गरजेचे आहे.कथा, कीर्तन,सप्ताह, पुण्यतिथ्या हे भक्ती उत्सव घडविणारे असतात.हसायला लावण्यासाठी कीर्तन नसावेत तर आत्मशोध,आत्मबोध करण्यासाठी असावेत. जीव कुटुंब वत्सल असतो,संत दिन वत्सल असतात. तृष्णा न संपणारे बेचैन असतात.गरजेपुरते धन असावे. भगवंताचे सतत स्मरण ठेवले तर एकदिवस माणुस हा भगवंताशी एकरुप होतो आणि सद्गुण संपन्न बनतो,सत्यनिष्ठ बनतो कारण परमात्मा हा एक सत्य आहे.सत्याचा स्वभाव आनंद आहे म्हणुन तो भगवंताचे स्मरणाने सदाआनंदी राहतो. माणसाने जीवनात तीनच कर्तव्ये करयचे असतात.एक सामान्य कर्तव्य आहे.ते म्हणजे स्वाभिमानाने जगण्यासाठी पैशाची प्राप्ती.पैसा हे साधन आहे साध्य नाही.कितीही पैसा मिळविला तरी पैसा सोबत येत नाही.यापुढे विशेष कर्तव्य आहे.ते म्हणजे पुण्य प्राप्ती जनसेवा,दानधर्म,परोपकार यातुन पुण्यप्राप्ती होत असते.मुख्य कर्तव्य म्हणजे परमेश्वराची प्राप्ती.यासाठी परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी परमार्थ करावा लागतो.पैशाने मिळते सामान,पुण्य कमविल्याने व पुण्यकर्माने मिळतो मान सन्मान आणि परमात्मा मिळाला तर जीवनात मिळते कायम समाधान. पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे तर पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे म्हणुन परमात्मा प्राप्तीसाठी हरिनाम घेतले पाहिजे. शास्त्र वाचन करावे, हरिकथा,कीर्तन श्रवण करावे.सदानंदी रहावे असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या