


आष्टी (प्रतिनिधी)
'नरदेह हा दुर्लभ आहे.भाग्याने हा देह मिळतो.या जन्मात भक्ती करा,भक्तीने मोक्ष मिळतो.नरदेह नाशीवंत आहे.हा देह मातीत मिसळणार याचे भान ठेवा आठवण ठेवा.मरणाचे स्मरण ठेवले की,जीवनाचे महत्व कळते..!' असे अत्यंत भावपूर्ण उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार हरिभक्ती परायण श्रीहरी पुरी महाराज यांनी काढले.
आष्टी तालुक्यातील अत्यंत ज्येष्ठ वयस्कर आणि एकेकाळ पैलवान म्हणून कारकीर्द गाजवलेले तब्बल 106 वर्षाचे आयुष्य लाभलेले पत्रकार उत्तमराव बोडखे यांचे चुलते भगवान बापू बोडखे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आयोजित प्रवचन सेवेत ह भ प श्रीहरी पुरी महाराज जीवनाचे महत्त्व आणि अंतर्मुख होण्याची गरज यावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन सराठे वडगाव येथे मांडत होते.
हभप श्रीहरी पुरी महाराज पुढे म्हणाले, कैलासवासी भगवान बापू बोडखे हे अनुभवाचे चालते बोलते विद्यापीठ होते. शांत अभ्यासू मनमिळावू अशा लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाला आज गावकरी मुकले आहेत त्यांच्या विचार आणि कार्याची शिदोरी सराटे वडगाव सह परिसरात कायम सुगंधी स्वरूपात राहील असा विश्वास त्यांनी दिला.
संतावर दृढविश्वास ठेवा.देव धावुन येतो.धर्मराजा व संत तुकाराम महाराज हे दोनच महात्मे सदेह वैकुंठास गेले आहेत.ईतरांना मरणाला सामोरे जावे लागलेले आहे.मरणाच्या वेळी ज्या ज्या पदार्थाचे,वस्तूंचे,भावाचे चिंतन,स्मरण करतो त्याच गतीला जीव पावतो.भगवंत म्हणतात माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर माझेच स्मरण केले पाहीजे. मानवी जीवनात दोन गोष्टींचे स्मरण असावं.एक देवाचं व दुसरे मरणाचं.मरणाचं स्मरण भगवंताचं स्मरण करून देण्याला कारण ठरते.संत म्हणतात. माणसाला मरणाचे स्मरणं असेल तर त्याला जीवन जगत असतांना कोणत्याही उपदेशाची गरज नाही.तो माणूस म्हणून जगत असतो.या जगात माणसं आहेत, संत आहेत आणि देवही आहे. माणसं अनंत आहेत संत काही एक आहेत.देव मात्र एक आहे.माणसाला स्तुती आवडते पण माणुस स्तुतीच्या पात्रतेचा नसतो. संत स्तुतीच्या पात्रतेचे असतात पण संतांना स्तुती आवडत नाही.देव मात्र स्तुतीलाही पात्र आहे आणि देवाला स्तुतीही आवडते. म्हणून माणसाला जीवनात मृत्युचंही स्मरण असावे आणि देवाचे स्मरण असावं, देवाच्या नावाने मरण चुकत नाही पण देवाच्या नावाने मरणाचं भय राहत नाही.मरण वाईट नाही.
मरणाचं भय वाईट आहे.मरण हे क्षणभर असते पण मरणाचे भय मात्र जन्मभर असते असे प्रतिपादन ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज यांनी केले.
यावेळी राजेंद्र धोंडे,विठ्ठलराव बन्सोडे,विक्रम पोकळे, दिलीपराव काळे, ह.भ.प. निवृत्तीदादा बोडखे महाराज,ह.भ.प. आप्पासाहेब सुंबरे महाराज,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,उपसभापती नामदेव धोंडे,चेअरमन बबन नन्नवरे,बलभीम सुंबरे,चेअरमन राजाराम नन्नवरे,
सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई,अर्जुन खेडकर सर,
सुखदेव बोडखे महाराज,सरपंच भीमराव बोडखे,शाम दळवी,प्रा.डाॕ.राम बोडखे, संपतराव धोंडे,भानुदास बोडखे,इंजि. पी.बी. बोडखे,प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे,
अशोक धोंडे आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
--------
*भगवंताचे स्मरण करा;
जीवन आनंदी बनेल!*
----------------
ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज पुढे म्हणाले की,भय निवृत्त घाण्यासाठी भगवंताचं स्मरण करीत जावे.काम सोडून देवाचं नाव न घेता आपल्या वाट्याला आलेले कर्म करायचं आणि काम करता करता देवाचे जरी नाव घेतले तर देव जीवाला त्यांच्यासारखच अविनाशी करत असतो. जीवनात भगवंताच्या नामाने त्याची प्राप्ती करुन घेता येते असे शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या