मर्यादा,प्रेम,आपुलकी आणि पराक्रम यांचा संगम म्हणजे रामायण ................... रामायणाचार्य ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे ..........................आष्टी येथील माऊली मंदिरात रामकथेस भाविकांची मोठी उपस्थिती...
आष्टी (प्रतिनिधी)
मर्यादा,प्रेम,आपुलकी, संस्कार,त्याग,प्रचंड, इच्छाशक्ती,असीम
धैर्य,पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण आहे असे सांगून अयोध्येचा राजा
असूनही रामाला वनवासात जावे लागले.श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे
पाहिले जाते मात्र असे असले तरी मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे
लागले.राम समजून घेण्यासाठी 'राम' म्हणेपर्यंत मेंदू आणि देह झिजवला तरी त्यामधील
काहीच भाग आपल्या हाती लागेल.मर्यादा, प्रेम,आपुलकी,संस्कार,
त्याग,प्रचंड,इच्छाशक्ती, असीम धैर्य,पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण आहे!'
असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.आक्रुर महाराज साखरे यांनी सांगीतले. आष्टी येथील
माऊली नगरात २० व्या. शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचे २४
व्या.पुण्यतिथीनिमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण
महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रेरणाने
ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम सप्ताह व संगीत रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरु आहे.या
भावपुर्ण कथेत ते बोलत होते. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे ,सौ. दमयंतीताई भीमराव
धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर, विठ्ठलराव बन्सोडे,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा
सौ.सविताताई गोल्हार, बलभीम सुंंबरे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, ह.भ.प.श्रीहरि
पुरी महाराज,ह.भ.प.दिनकरराव तांदळे,सुखलाल मुथा,सरपंच सौ.मुळे, माजी सरपंच आदिकाताई
लोखंडे,प्राचार्य चंद्रकांत गोसावी,गोविंद महाराज पवार,तुळशीराम चटाले, सोनाजी बनकर
महाराज,पत्रकार शरद रेडेकर,कपीलशेठ अग्रवाल,दत्तात्रय निंबाळकर,बलभीम धोंडे,सरपंच
परिवंत गायकवाड,अशोक बळे,प्राचार्य के.बी.खाडे,हौसराव आजबे ,ज्ञानेश्वरी
केरुळकर,खाडे सर, भाऊसाहेब कोकणे उपस्थित होते. रामायणाचार्य ह.भ.प.आक्रुर महाराज
म्हणाले की,घर हे मंदीर बनविणारी रामकथा आहे.घरात देव आणणारी रामकथा आहे.जीवनात सुख
आले तरी आणि दुःख आले तरी साधुकडे जा..साधुकडुन सोडवणुक होतेच.मैत्री टिकविण्यासाठी
स्पष्ट बोलणे, समाज जिंकण्यासाठी गोड बोलणे आणि शत्रू संपविण्यासाठी कपट
लागते.निंदारुपी दगड मागुन येतो. स्तुतीरुपी दगड समोरुन येत असतो.स्तुतीरुपीदगड
चुकविता येतो मात्र निंदारुपी दगड चुकविता येत नसतो.संतानी भक्ती केली आणि देवाने
अनेक अवतार घेऊन चरित्र केले म्हणुन अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच मग ते धार्मिक
क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र असो लोकहितासाठी झटणारे नेते असो अथवा देश
पारतंत्र्यातुन स्वतंत्र करणारे राष्ट्रभक्त असो त्यांचे अलौकिक कार्य आहे.संत व
देवाचे चरित्र असते सामान्यांचे चरित्र नसते.संत,देव आणि अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच
चरित्र होत असते असेही ह.भ.प.आक्रुर साखरे महाराज म्हणाले.नवविधा भक्ती ज्या घरात होत
असते तेथे भगवंताचे आगमन होत असते.काम,क्रोध व लोभ हे तीन विकारा गेल्याशिवाय खरी
देवाची भक्ती करता येत नाही.पापाचा बाप लोभ असतो.भगवंताचा सहवास फक्त पुर्व
पुण्याईने मिळतो.संत हे जगताच्या उध्दारासाठी, हितासाठी मृत्यू लोकात येतात.गुरु
देवापेक्षा श्रेष्ठ असतो, गुरुची निंदा केलेली सहन करु नये.या सप्ताहात भजन,कीर्तन,
अन्नदान आदीसह अध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत. या रामकथेस हजारो भावीकभक्त उपस्थित
असतात.हा सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी माऊली सेवा मंडळ सदस्य व नागरिक परिश्रम
घेत आहेत.
चौकट
--------
*माजी आमदार धोंडे यांनी सपत्नीक राम कथा श्रवण केली!*
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि गोड, मधुर शब्दातील रामायण आणि राम कथेतील अनेक प्रसंग हभ प
अक्रूर महाराज साखरे यांनी आपल्या अत्यंत गोड वाणी आणि मंजुळ स्वरातून शब्दबद्ध
केले. प्रचंड टाळ्या आणि अंतर्मुख होऊन यावेळी भाविक भक्तांनी या सुंदर कथेचा लाभ
घेतला. मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिक्षण महर्षी भीमराव धोंडे आणि
त्यांच्या सौभाग्यवती सुविद्य पत्नी दमयंतीताई यांनी या राम कथेचा अत्यंत मनोभावे
श्रवण करत लाभ घेतला.
-------------------------------
0 टिप्पण्या