
आष्टी (उत्तम )बोडखे) )
साधारणपणे काही वर्षापासून राजकारण बदमाशाचा अड्डा झाल्याचे
बोलले जाते.राजकारण आणि राजकारण्याविषयी सर्वसामान्य जनतेत प्रचंड चिड व संताप
असल्याचे जाणवते परंतु अशा अवस्थेतही आपल्या लोकप्रिय नेत्याच्या पराभवानंतर थेट
स्वतःचा जीव देण्यापर्यंत मजल जावी.. इतकी एखाद्या नेत्याची लोकप्रियता असावी..हे
आजच्या स्थितीत विशेष लक्षवेधी आहे! परंतु असा प्रकार प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात
घडला आहे.देशाची लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली.अनेक टप्प्यातील मतदानाचे निकाल
लागले.या निकालात अनेक धक्कादायक निकालही लागले. त्यात महाराष्ट्राच्या
मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा विशेष संदर्भ देता येईल. बीड जिल्हा हा हिंदुस्तानचे
माजी ग्राम विकासमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांचा जिल्हा
आहे.मुंडेसाहेबांना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देशाचे ग्रामविकास मंत्री
होण्याचेही भाग्य लाभले होते. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या
डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी दोन टर्म येथून खासदार म्हणून देशाच्या संसदेमध्ये
उत्कृष्ट कार्य बजावले.यंदाच्या तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने डाॕ.प्रीतमताई ऐवजी
पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी दिली.खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
उमेदवारी जाहीर केल्यानंतर आंबेजोगाई येथे जाहीर सभा घेत पंकजाताई मुंडेंना बळ
देण्याचे आवाहन करून पंकजाताईंचे कौतुकही केले होते. पंकजाताई मुंडे या मास लीडर
आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची वेगळी छबी आहे.कुठलाही
गॉडफादर नसताना महाराष्ट्राच्या मंत्री असताना त्यांनी केलेले कार्य आजही
महाराष्ट्राच्या स्मरणात आहे.परंतु दुर्दैवाने लोकसभेच्या खासदारपदाच्या निवडणुकीत
त्यांचा काही जातीय ध्रुवीकरणामुळे अल्पशा मताने निसटता पराभव झाला.हा पराभव पचवणे
हे अनेकांसाठी अवघड झाले.परंतु केवळ दुःख वेदना एवढ्यावरच हे न थांबता बीड
जिल्ह्यातील तमाम मुंडे घराण्यावर प्रेम करणाऱ्या विविध जाती धर्म पंथातील
युवकांसाठी ही बाब असह्य झाली.याचाच परिणाम म्हणून गेल्या चार दिवसात तब्बल तीन
आत्महत्या झाल्या.युवकांनी ताईसाहेबांचा पराभव असह्य झाल्याने आपली आयुष्याची जीवन
यात्राच संपवून टाकली.. यावेळी त्यांनी आपल्या घरच्यांचाही कसलाच विचार केला
नाही.आपल्या नेतृत्वावर किती प्रेम असावे याचे उत्तम आणि देशातील अत्यंत अपवादातील
हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरणं आहे. चौकट ----------- लोकनेते गोपीनाथराव मुंडे
यांनी दिलेले हे प्रेम जिव्हाळा अस्था,माया हे मूल्य बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात
चंद्र सूर्य असेपर्यंत राहील याचे हे द्योतक आहे.दरम्यान अशा घटना घडू नये..
युवकांनी अशी टोकाची भूमिका अजिबात घेऊ नये अशी आर्त हाक गोपीनाथराव मुंडे
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राची बुलंद तोफ लोकनेत्या पंकजाताई मुंडे
यांनी दिली आहे. ---------------------------------------
0 टिप्पण्या