Ticker

6/recent/ticker-posts

पंकजाताई मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला; पोपट वायभासे या युवकाची आत्महत्या! ---------------------------------------- बीड जिल्ह्यातील दुसरी घटना; पंकजाताईंचे भावनिक आवाहन .......................

आष्टी ( प्रतिनिधी ) लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा वैचारिक वसा आणि वारसा सक्षमपणे चालवणाऱ्या माजी मंत्री आणि गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकजाताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिल्ह्यातील तमाम मुंडे प्रेमींना सहन होत नसल्याने अनेकांना प्रचंड दुःख झाले. जिल्ह्यात दोन युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. काल आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे या युवकांनी केलेली आत्महत्या अत्यंत वेदनादायी असून दरम्यान युवकांनी धीर धरावा असे प्रकार कृपया करू नका असे भावनिक आवाहन अत्यंत व्यथीत होत पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.पंकजाताई मुंडे यांंच्या पराभवामुळे आष्टी तालुक्यातील युवकांनी केलेली ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक एका तरूणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली.पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अशी दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील युवकानेही मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवले होते. आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे (३७) हा तरूण मुंडे समर्थक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागला. पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात गेला होता. मंगळवारी रात्री दरम्यान त्याने कोणाला काही एक न बोलता वायभासे या तरुणाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.पोपट वायभासे हा तरुण मुंडे घराण्यावर प्रचंड प्रेम करणारा होता. बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये मुंडे घराण्याची फार मोठी भूमिका आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे अत्यंत लोकप्रिय असे नेते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची महती होती.त्यांच्याच विचार आणि कार्यावर चालणाऱ्या पंकजाताई मुंडे यांना यश येणे अपेक्षित होते; परंतु दुर्दैवाने काही तात्कालीक कारणांमुळे अल्पशा मताने त्यांना पराभव पत्करावा लागला.परंतु हा पराभव त्यांच्या असंख्य लाखो मुंडे आणि असंख्य बीड जिल्हा वासियांना सहन होत नाहीये.या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या