

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी पोलीस ठाणे हद्दितील नागरिकांना आष्टी पोलीसांच्यावतीने
बीड लोकसभा निवडणुक निकालाबाबत शांतता अबाधीत ठेवण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले
आहे. बीड लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने दि.१० मार्चपासून ते दि.६
जुनपर्यंत आदर्श आचार संहिता अंमलात लागु आहे. बीडसह संपूर्ण देशभरात लोकसभा
सार्वत्रीक निवडणूक २०२४ चा निकाल दि. ४ जुन रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे कोणीही
नागरीक ही निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मिडीयाच्याद्वारे फेसबूक,
इन्स्टाग्राम, हाॕटसॲप ग्रुप व इतर तत्सम अप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही
समाजाच्या जातीच्या, धर्माच्या,धार्मीक भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या
पोस्ट,कमेंट, स्टोरी,स्टेटस,डिजीटल बॅनर असे प्रकार सोशहृ मिडीया माध्यमाद्वारे करु
नयेत. कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये,डिजे वाजवनार नाहीत,फटाके फोडणार नाहीत,
विना परवाना विजयी मिरवणुक काढू नये. हाॕटसअप ग्रुपचे ॲडमीन यांनी दि. ३ ते दि.५
जुन या कालावधीमध्ये त्यांचे ग्रुपचे सेटिंगमध्ये only admin (फक्त टोळी मुकादम)
करुन बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर
टाकणार नाहीत.जर अडमीन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही.कोणी सदस्याने वादग्रस्त
पोस्ट टाकल्याने काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या
सदस्यासह ग्रुप ॲडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे
पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पण्या