Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे सुपुत्र,मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांचा आज मुंबई मंत्रालयात सेवापूर्ती सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) आष्टीचे सुपुत्र,मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांचा आज शुक्रवार दि.३१ मे २०२४ रोजी दुपारी ४ वा.परिषद सभागृह, सहावा मजला मंत्रालय (विस्तार), मंत्रालय मुंबई येथे सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.आष्टी शहरातील रहिवासी असलेले सुनील साहेबरावजी चव्हाण यांनी रत्नागिरी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणुन उत्कृष्ट काम केले आहे.छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणुन त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे.सुनील चव्हाण हे आष्टीचे सेवानिवृत्त तहसीलदार साहेबरावजी चव्हाण यांचे सुपुत्र तर माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यांचे मोठे बंधू आहेत.मराठवाडयाचे भूमीपुत्र असलेले सुनील साहेबरावजी चव्हाण हे २००७ च्या आयपीएस बँचचे अधिकारी आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एम.एसस्सी. कृषी-मृदा आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.यापुर्वी त्यांनी मंत्रालयात मुंबई येथे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.रत्नागिरीत लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणुन काम केले.सुनिल चव्हाण यांनी राज्याचे कृषी आयुक्तपद समर्थपणे सांभाळले.त्यांनी ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून साडेतीन वर्ष काम पाहिले आहे.ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्यकार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करतांना ५५०० कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून १५० पेक्षा जास्त योजना राबविल्या.अतिरिक्त आयुक्त म्हणून १८ हजार पेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली होती त्यामुळे एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.आष्टीकरांना या अधिका-याचा अभिमान व स्वाभिमान आहे.आज आष्टीचे सुपुत्र,मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांचा आज मुंबई मंत्रालयात सेवापूर्ती सोहळा होत आहे.सुनिल चव्हाण यांना घटना आष्टीकरांची मान उंचविणा-या घडल्या आहेत.सुनिल साहेबराव चव्हाण यांनी रत्नागिरी, संभाजीनगर जिल्हाधिकारी म्हणुन प्रभावी व उल्लेखनीय काम केलेले आहे.समस्त आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने सुनिल चव्हाण यांना सेवापुर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या