Ticker

6/recent/ticker-posts

कु.गौतमी संजय सानप हिचे सीबीएसई परीक्षेत यश

आष्टी ( प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.संजय सानप यांची कन्या कु.गौतमी सानप हिने सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयात गौतमी तृतीय क्रमांक पटकावत यशाची मानकरी ठरली आहे.कु.गौतमी सानप ही अत्यंत शांत,संयमी, अभ्यासू आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच गौतमीने आपल्या प्रत्येक वर्गात सर्वोत्तम गुण प्राप्त करून वेगळेपण जपले आहे. आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनानुसार तिने शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली आहे.वडील प्रसिद्ध विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते तर आई कृषी विभागात कार्यरत आहेत.कु. गौतमी सानप हिने ७४.८० टक्के गुण नुकत्याच लागलेल्या बारावी बोर्ड सीबीएसई परीक्षेतून प्राप्त केले आहेत.याबद्दल तिचे शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध स्तरातून कौतुक होत आहे.दरम्यान,भविष्यात तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे.गौतमीच्या या उज्वल यशाबद्दल तिचे अभिनंदन कर्मवीर आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर काकडे यांच्यासह सर्व पदाधिकारी,प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह डॉ.सोमनाथ बडे,प्रा.सचिन बडदे, प्रकाश शिंदे,राजेंद्र पानगव्हाणे,अरुणराव गर्जे,विलास लवांडे,भिसे , संजय आंबेकर, अभयशेठ वाबळे,सुनील जाधव, राहुल शेठ गणगे, आदर्श शिक्षीका प्रा. आशाताई चाटे,ज्ञानदेव सानप यांनी केले आहे. चौकट -------- गौतमी सानप हिने सीबीएसई परीक्षेत मिळवलेले यश तिच्या भविष्यातील यशदायी प्रवासाची सुरुवात आहे. कुटुंबातील संस्काराच्या योग्य दिशेने असून त्यानुसार भविष्यात डॉक्टर होऊन सर्वसामान्य गोरगरीब दिन दुबळ्या शेतकरी मजुरांच्या आरोग्याची सेवा करावी अशी अपेक्षा यावेळी अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य मुप्टा असोसिएशनचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.बिभिषण चाटे यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या