आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे गुरुवर्य संत मदन महाराज
बिहाणी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या प्रेरणेतून दि.१८ ते
२५ मे या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण,श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह
सुरु होत आहे.या सप्ताहात आळंदीचे कथा प्रवक्ते ह.भ.प.रामायणाचार्य संतोष महाराज
मोरे यांची कथा होणार आहे.त्यांना साथसंगत ह.भ.प.संपत महाराज दानवे (संगीत विशारद),
ह.भ.प. हंसराज महाराज मगर, सिंथेसायझर वादक ह.भ.प.गंगाराम महाराज झाडे तबला वादक
ह.भ.प.शेखर महाराज दरोडे (संगीत विशारद) यांची लाभणार आहे. दररोज दुपारी २ ते ५ या
वेळात कथा प्रवक्ते ह.भ.प.रामायणाचार्य संतोष महाराज मोरे (आळंदी) यांची संगीत राम
कथा होणार आहे.या सप्ताहात काकडा भजन,विष्णुसहस्त्रनाम,गीतापाठ,पसायदान,
ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,संगीत राम कथा,हरिपाठ,हरिकीर्तन, जागर (संगीत भजन) आदी
धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक विश्वस्त,
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, (आळंदी देवाची), ह.भ.प.सोहम महाराज काकडे (स्टार
प्रवाह फेम) श्री क्षेत्र मेहकर (बुलढाणा),ह.भ.प. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज
घुगे(श्री क्षेत्र आळंदी देवाची),ह.भ.प. भागिरथ महाराज मते (श्री क्षेत्र
वडीकळा,जि. जालना),ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव (वेदांत सत्संग समिती)( आळंदी
देवाची), ह.भ.प.स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत (श्री क्षेत्र गेवराई) तर दि.२४ मे
रोजी सकाळी ११ते १ यावेळेत राष्ट्रीय धर्माचार्य, समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती
महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे.दि.२४ मे रोजी ह.भ.प.भागवत
महाराज उंबरेकर(अध्यक्ष श्री क्षेत्र वृध्देश्वर देवस्थान) यांचे रात्री हरिकिर्तन
होणार आहे.शनिवार दि.२५ मे रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत कडा येथील संत मदन महाराज
देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन होणार
आहे.दि.२५ मे रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी,अभंगगाथा, रामायण,गुरुवर्य संत मदन
महाराज यांच्या प्रतिमेची आणि ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल महाराज यांची
टाळ-मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे. गुरुवार दि. २५ मे रोजी
सकाळी १० ते १२ या वेळेत संत मदन महाराज संस्थान कडा व गुरुकुल आश्रम धामणगांवचे
अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे सुश्राव्य हरिकिर्तन
होईल.त्यानंतर महाप्रसादाची पंगत होईल. ********
0 टिप्पण्या