आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील सराटेवडगांव येथील जानपीर देवस्थान
यात्रेनिमित्त दि.१६ आणि १७ मे असा दोन दिवस याञा उत्सव संपन्न झाला.छबीना मिरवणुक
झाली.राञी नामांकीत लोकनाट्य तमाशा झाला.शोभेच्या दारुची अतिषबाजी करण्यात आली.
सकाळी आर्केस्टाचा हजे-याचा कार्यक्रम झाला.मराठी परंपरा जोपासणारा गीतांचा
मराठी,हिंदी लोकगीते,लावणी सोबत वेस्टर्न नृत्याविष्कार असा मनोरंजनाचा आॕकेस्टा
कार्यक्रम झाला. शुक्रवारी सायंकाळी ४ ते ७ यावेळात जंगी कुस्त्यांचा हंगामा झाला.
कुस्तीच्या जंगी हंगाम्यात नामांकीत मल्लाच्या कुस्त्या झाल्या.अनेक कुस्त्या चितपट
झाल्या.अंतीम कुस्ती महेश आजबे यांंच्या हस्ते लावण्यात आली. ऐक्य,अन् बंधुत्वाचे
प्रतीक जानपीरबाबा यात्रेत 'सर्वधर्मसम भावाचे दर्शन!अंतिम २१ हजार रुपयाच्या
रंगतदार कुस्तीने यात्रा उत्सवाची शानदार सांगता झाली.जंगी कुस्ती स्पर्धेच्या
फडाने सराटेवडगावच्या जानपीर यात्रेत उत्साह आष्टी तालुक्यातील जानपीर देवस्थानाचा
यात्रा उत्सव अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात भाविक भक्तांच्या तसेच कुस्तीप्रेमी,
मल्लांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाला.भक्तांच्या श्रद्धेला पावणारा म्हणून
जानपीर देवस्थानाकडे पाहिले जाते.गेल्या कित्येक वर्षाची या यात्रा उत्सवाची परंपरा
आहे. सराटेवडगावसह आष्टी तालुक्यांमध्ये प्रसिद्ध आहे.दरवर्षी विविध भागातील विविध
समाजाचे लोक याठिकाणी अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने नतमस्तक होण्यासाठी
येतात.यंदाच्या यात्रोत्सवात मोठी आरास करण्यात आली होती यात्रेतील छोट्या मोठ्या
उद्योग व्यवसायिकांनी मोठी गर्दी केली होती. बच्चे कंपनींच्यासाठी करमणुकीची अनेक
साधने आणि वस्तूंची रेलचेल होती.विशेष म्हणजे सर्व धर्मीय आणि सर्व जाती
धर्मपंथांच्या भाविक भक्तांनी जानपीर देवस्थानाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन स्वतःला
धन्यता मानली.या यात्रा उत्सवातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातील आलेल्या
पैलवानांनी कुस्तीप्रेमी ग्रामस्थांच्या इच्छा पूर्ण केल्या १५ किलो वजन गटापासून
ते शंभर किलो वजन गटापर्यंतच्या विविध पैलवानांच्या कुस्त्या डोळे दिपवणा-या
ठरल्या.अनेक कुस्त्या निकाली निघाल्या तर काही समांतर सोडवण्यात आल्या. यावेळी
विभागून बक्षीस देण्यात आली.यावेळी जामखेड,आष्टी यांच्यासह अनेक कुस्तीप्रेमी
आवर्जून उपस्थित राहत त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन दिले.
चौकट
------------
शाकाहारी प्रसाद; जानपीर देवस्थानाचे मुख्य वैशिष्ट्य

-----------------------------------------
सराटेवडगावच्या माळरानावर जानपीरबाबा
यांचे हे पवित्र स्थळ आहे.याच स्थळी जानपीरबाबांचा यात्रा उत्सव असतो.येथील
देवस्थानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या देवस्थानाला गुळ नारळ शेरनी मलिदा असा पूर्ण
शाकाहारी प्रसाद वाटप केला जातो मात्र त्यासाठी पशुहत्येची आजही परंपरा आहे.यात्रा
उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सरपंच ,उपसरपंच,ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले.
---------------------------------------
0 टिप्पण्या