
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ,
माजी आ.भीमराव धोंडे यांचे लहाण बंधु ,लोणी सय्यदमीर जि.प.गट. आणि हरिनारायण आष्टा
जि.प.गटाचे माजी सदस्य,शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी
चेअरमन शेतकरी सहकारी सुतगिरणीचे माजी चेअरमन आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक
बापुराव आनंदराव धोंडे (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे २ वा.हृदयविकाराने निधन
झाले.माजी आ.भीमराव धोंडे यांचे लहाण भाऊ म्हणुन बापुराव धोंडे यांंच्यावर अतिशय
प्रेम होते. बापुराव धोंडे काका यांना राजकारणातील अनेक पदे धोंडे साहेबांनी दिले
होते.एक शांत,संयमी आणि प्रचंड बंधुप्रेम जपणारा भाऊ अशी बापुकाकांची प्रतिमा
जिल्हाभर होती.राजकीय,सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर बापुकाकांची मस्करी करीत
असत परंतु त्याचा कधीही राग लोभ न धरात थट्टेथटेतच हजर जबाबी उत्तर ते देत असत.
आ.सुरेश धस यांचे मोठे बंधु देविदासआबा धस,माजी आ. साहेबराव दरेकर यांचे कनिष्ठ
चिरंजीव उध्दवबापु दरेकर,विजय गोल्हार, सतीषमामा झगडे हे बरोबरच बीड जि.प.सभागृहात
सदस्य असल्याने यांंच्यातील थट्टा,विनोद ,मस्करी अनेकदा तालुक्याला पाहायला मिळली
होती. निर्मळ मनाचा,मैत्री जपणारा,निगर्वी मोठ्या मनाचा माणुस म्हणुन बापुराव धोंडे
यांची जिल्हाभर ओळख होती. शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे
चेअरमनपद सांभाळताना संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत करणारे चेअरमन अशी
प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली होती.त्यांच्यापाठीमागे माजी आ.भीमराव धोंडे,कडा
कृ.उ.बा. समितीचे उपसभापती नामदेव धोंडे ,राजेंद्र धोंडे आणि ज्ञानदेव धोंडे हे चार
भाऊ,पाच बहिणी,एक मुलगा,एक मुलगी,पत्नी असा मोठा परिवार आहे. जन्मगाव रुईनालकोल
येथील वैंकुठधामात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी राजकीय,सामाजिक,धार्मिक
क्षेत्रातील मान्यवर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या