Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून सन्मानित चेअरमन विठ्ठल शेंबडे सन्मानित

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील महावितरण कंपनीचे कर्मचारी तथा साईनाथ साईनाथ वीज कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल शेंबडे यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लातूर परिमंडळाच्यावतीने मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते " उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी " म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी अधीक्षक अभियंता सांगळे हे उपस्थित होते. आष्टी उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ विठ्ठल विश्वनाथ शेंबडे यांच्या कामाची पावती म्हणून कंपनीने नेमुन दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिन्यांची देखभाल करणे,अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, त्याव्दारे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्ये बजावतांना विठ्ठल शेंबडे यांनी दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव करून त्यांना कामगार दिनी सन २०२३- २०२४ करिता "उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी" म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.यानिमित्ताने लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपतटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.या पुरस्काराबद्दल चेअरमन विठ्ठल शेंबडे यांचे आ.सुरेश धस,माजी जि.प.सदस्य देविदास धस,शाम धस,जयदत्त धस, सागर धस,उपकार्यकारी अभियंता देशमुख,अँड.बाळासाहेब मोरे,उत्तम पठाडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,पोलीस सोमनाथ गायकवाड,अजित गायकवाड, प्रयोगशाळा अधिकारी नागेश कारंडे, सचिन कोकणे आदींसह आष्टी तालुका महावितरण कंपनी व साईनाथ वीज संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या