Ticker

6/recent/ticker-posts

समाजात वाचनसंस्कृती रूजविण्याची गरज ............ लता गुठे .....प्रा.डाॅ.महेश खरात यांंच्या हस्ते काव्य संमेलनचे उद्घाटन ....................

U आष्टी (प्रतिनिधी ) टी.व्ही.मोबाईलच्या या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.तिचे पुर्नजीवन करण्यासाठी कवी,लेखक, साहित्यिकांना ठोस भुमिका घ्यावी लागेल. मुलांवर चांगले संस्कार करणे ही आई-वडील, शिक्षक आणि लेखकांचीही जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुंबई येथील सुप्रसिद्ध कवयित्री तथा प्रकाशिका लता गुठे यांनी केले. एकता फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा मातृदिन काव्य सप्ताहानिमित्त १५ वे. राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. संभाजीनगर येथील जेष्ठ लेखक प्रा.डाॅ.महेश खरात यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी एकताचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार,कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे,एकता फाउंडेशन परभणी जिल्हाध्यक्ष पु.ना.बारडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे व प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून गेल्या चार दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून दि.१८ मे रोजी त्याची सांगता होणार असल्याचे एकताच्या सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे व महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे यांनी सांगितले.काव्यसंमेलनाचे प्रस्ताविक उपाध्यक्ष मिरा दगडखैर तर आभार उपाध्यक्ष नितीन कैतके यांनी मानले. या काव्य संमेलनात निर्मला शेवाळे (मुंबई), माया दिवाण (बीड), अरूणा दिवेगावकर (लातूर), अलकनंदा घुगे-आंधळे (जालना), प्रा.शंकर राठोड (नांदेड), सुनिता चव्हाण (नांदेड), रामदास घोडके (पैठण) यांनी सहभाग घेतला तर पुणे येथील सुप्रसिद्ध गझलकार बबन धुमाळ यांनी या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. चौकट ------------ एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, मुक्त सृजन संभाजीनगर सारख्या संस्थांनी राज्यभरातील लहान मोठ्या कवी लेखकांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याने अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संस्थांची मक्तेदारी मोडीत निघाल्याची माहिती काव्य संमेलनाच्या उद्घाटक पदावरून बोलतांना प्रा.डाॅ.महेश खरात यांनी उपस्थितांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या