
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यात जातीय सलोखा कायम ठेवावा. कोणतीही आक्षेपार्ह
पोस्ट टाकू नये,दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये.समाजातील नेते
यांचेविरुद्ध खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशा
लोकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.अशादोन आरोपीविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशनकडून
कारवाई करण्यात आलेली आहे.आष्टी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी
बेकायदेशीर जमाव जमवून दुसऱ्या समाजावर हमला अथवा शिवीगाळ करणे आदि कृत्य करताना
दिसून येत आहे.कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर
समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी
केले आहे. काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असून सोशल मीडियाचा दुरुपयोग होत
असल्याचं सध्या दिसून येत आहे. सोशल मीडियावर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर,
व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यातून समाजातील धार्मिक
भावना दुखावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.अनेक युवक सोशल मीडियाच्या आहारी
जात असून त्याचा दुरुपयोग होत आहे. विविध समाजातील लोकं दुसऱ्या समाजातील नेते
यांचेविरुद्ध खालच्या स्तराला जाऊन कमेंट करत असलेचे निदर्शनास येत आहे.त्यावरून
दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. माहिती प्राप्त होताच अथवा तक्रार प्राप्त होताच
संबंधित याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा दोन आरोपी विरुद्ध आष्टी
पोलीस स्टेशन कडून कारवाई करण्यात आलेली आहे. सदरील बाब ही कायदेशीर रित्या हाताळली
जात आहे.तरी याचा गैरफायदा घेण्यासाठी काही समाज कंटक एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव
जमवून दुसऱ्या समाजावर हमला अथवा शिवीगाळ करणे ई कृत्ये करताना दिसून येत आहे.पोलीस
विभागाकडून वाईट कमेंट करणारे यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई झालेली असतानाही व
जमावबंदीचे आदेश लागू असताना जे कोणी बेकायदेशीर पणे जमाव जमवून असे कृत्य करतील
त्यांचेविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल कोणीही कायदा हातात घेऊ नये.
बेकायदेशीर जमाव जमवू नये.सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या
धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये असे
आवाहन पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, सपोनि हिंगे,पोलिस उपनिरीक्षक धनवडे,पो.ह.
शिंदे ,पो.ना क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल वाणी, गुंडाळे,आष्टी पोलिसांनी केले आहे.
0 टिप्पण्या