Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक बापाच्या ह्रदयात एक आई दडलेली असते .............. डाॅ.उर्मिला चाकूरकर ..................... प्रा.डाॅ.भास्कर बडेंच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

आष्टी (प्रतिनिधी ) फक्त आईकडेच मातृह्रदय असते असे काही नसून प्रत्येक संवेदनशील बापाच्या ह्रदयातही एक आईचा निश्चितच वास असतो. अगदी पुरातन काळाचा विचार केला तर अर्धनारी नटेश्वरापासून २० शतकातील साने गुरूजींपर्यंत ही परंपरा आपल्याला पहायला मिळेल असे प्रतिपादन पैठण येथील सुप्रसिद्ध लेखिका डाॅ.उर्मिला चाकूरकर यांनी केले. एकता फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित मातृदिन काव्य सप्ताहानिमित्त १६ वे. राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी केले. संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, एकताचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे यांची उपस्थिती होती. एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे आणि प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख यांनी या ऑनलाईन काव्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संध्याराणी कोल्हे (धाराशीव),जयश्री मुंढे (आंबाजोगाई), सुरेखा येवले (बीड), एकता फाउंडेशनच्या परभणी जिल्हा महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, अंकुश सिंदगीकर (लातूर), सचिन बेंडभर (पुणे), आत्माराम शेवाळे (आहिल्यानगर) यांनी या काव्य संमेलनात सहभाग नोंदवून उपस्थितांना तब्बल दोन तास खिळवून ठेवले. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन एकता फाऊंडेशन मराठवाडा विभागीय सचिव के.बी.शेख यांनी केले. संमेलनात महाराष्ट्राभरातील कवी, लेखक यांसह एकता फाउंडेशन च्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चौकट ********* नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील साहित्यबीज अधिक सकस असल्याने साहित्य वर्तुळात २१ व्या. शतकात ग्रामीण कवी, लेखक, साहित्यिकांचाच प्रभाव जास्त दिसून येतो हे सत्य नाकारून चालणार नाही असे प्रतिपादन काव्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या