
आष्टी (प्रतिनिधी)
२० व्या शतकातील महान संत प.पू.ब्र.भु. ज्ञानेश्वर माऊली
चाकरवाडीकर यांचे २४ व्या.पुण्यतिथीनिमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या
सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखिल भारतीय वारकरी
मंडळाचे प्रेरणाने ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम सप्ताह व संगीत रामायण कथा
ज्ञानयज्ञ सोहळा आष्टी शहरातील माऊली नगरातील माऊली मंदिर आवारात होत आहे. संत
ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या २४ व्या. पुण्यतिथीनिमित्त गेवराई येथील
कीर्तनकेसरी रामायणाचार्य ह.भ.प. आक्रुर महाराज साखरे यांची संगीत रामकथा शनिवार
दि.१५ ते शनिवार दि.२२ जुन २०२४ या कालावधीत होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व अखंड
हरिनाम सप्ताह दि.१५ ते २२ जुन २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.या
सप्ताहात काकडा भजन, विष्णु सहस्रनाम, गीतापाठ,पसायदान, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा
भजन,दररोज दुपारी २.३० ते ५.३० संगीत रामायण कथा,सायंकाळी हरिपाठ, रात्री ८ ते १०
हरिकीर्तन नंतर संगीत भजन, हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे.
शनिवार दि.१५ जुन रोजी नामधारक ह.भ.प.संत आसाराम महाराज केळसांगवीकर यांचे
नामसंकीर्तन,रविवार दि.१६ जुन रोजी कडा येथील संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे
अध्यक्ष रामायणाचार्य ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे हरिकीर्तन,सोमवार दि.१७ जुन
रोजी गोभक्त ह.भ.प.प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर यांंचे हरिकीर्तन,मंगळवार
दि.१८ जुन रोजी भागवताचार्या ह.भ.प. सोनालीताई फडके (दौंड) यांंचे हरिकीर्तन,
बुधवार दि.१९ जुन रोजी कीर्तनकेसरी तथा रामायणाचार्य ह.भ.प. अकुर महाराज साखरे
(गेवराई) यांंचे हरिकीर्तन, गुरुवार दि.२० जुन रोजी अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा
विभागाचे उपाध्यक्ष , समाजप्रबोधनकार वैराग्यमुर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापु
महाराज (पाटोदा) यांचे हरिकीर्तन,शुक्रवार दि.२१ जुन रोजी सकाळी १० ते १२ या वेळात
पुण्यकालाचे हरिकीर्तन श्री क्षेत्र वृध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष वै.संत रघुनाथ
महाराज उंबरेकर यांचे वंशज ह.भ.प. भागवत महाराज उंबरेकर यांचे हरिकीर्तन तर
संध्याकाळी आळंदी येथीला विश्वशांती केंद्राचे मठाधिपती ह.भ.प. सुदाम महाराज
पानेगावकर यांंचे हरिकीर्तन होणार आहे. शनिवार दि.२२ जुन रोजी सकाळी १० ते १२
यावेळात अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे
काल्याचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार दि.२१ जुन रोजी रामकथा विश्राम पावल्यानंतर
ज्ञानेश्वरी, अभंगगाथा,श्रीमद भागवत,गुरुवर्य संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर
महाराजांच्या प्रतिमेची टाळ-मृदंग,ढोल-लेझीम व बॅण्डपथकासह भव्य मिरवणूक होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती तपोनिधी ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, आ.बाळासाहेब आजबे,
आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर,बीड जि.प. च्या माजी
अध्यक्षा सौ.सविताताई गोल्हार, डॉ.शिवाजी राऊत, सतिषआबा शिंदे,ॲड. साहेबराव
म्हस्के, आण्णासाहेब चौधरी, नगराध्यक्ष जिया बेग ,उपनगराध्यक्ष शैलेश
सहस्त्रबुद्धे,अशोक मुळे,सरपंच सौ.शालन अशोक मुळे,उपसरपंच डाॕ.जालींदर वांढरे,जि.प.
सदस्य,सभापती, उपसभापती,पं.स.सदस्य,सर्व पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक
भक्त उपस्थित राहणार आहेत.सप्ताहात विष्णूसहस्रनाम व गीतापाठ - ह.भ.प. निवृत्ती
महाराज बोडखे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरी कंठस्य ह.भ.प.बालाजी महाराज
कवठेकर,मृदंगाचार्य मृदंग विशारद ह.भ.प. ओम महाराज नन्नवरे, ह.भ.प.औदुंबर आवारे तर
गायनाचार्य ह.भ.प. अनिल महाराज गरूड, ह.भ.प.बबन महाराज बळे,ह.भ.प.अशोक महाराज
बळे,ह.भ.प. देविदास महाराज बर्डे, ह.भ.प.रविंद्र महाराज तवले,ह.भ.प.तळेकर,
कु.ज्ञानेश्वरी केरुळकर, कु.माधुरीताई बनसोडे, काकडा भजन- ह.भ.प. रावसाहेब महाराज
आडसरे,ह.भ.प. गोपीनाथ महाराज पोकळे,ह.भ.प. भानुदास महाराज कोकणे,ह.भ.प. मच्छिंद्र
महाराज करडुळे, ह.भ.प.नानासाहेब तवले, ह.भ.प.शामराव झांबरे व हार्मोनियम - ह.भ.प.
उत्तमराव पोकळे यांची साथसंगत लाभणार आहे .या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने
उपस्थित राहुन ज्ञानामृत सेवन करावे असे आवाहन माऊली सेवा मंडळ,माऊलीनगर, माऊली
मंदिर यांनी केले आहे. ********************
0 टिप्पण्या