आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील शेतकरी संस्था आणि भगिनी संस्थेच्या माध्यमिक
विद्यालयांचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च -एप्रिल २०२४ चा निकाल जाहीर झाला
आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ ,विभागीय मंडळ छत्रपती
संभाजीनगर यांनी दि.२७ मे २०२४ रोजी निकाल जाहीर झाला आहे.शेतकरी शिक्षण संस्था आणि
भगिनी संस्थेने निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे. संस्थेच्या ३९ शाळेपैकी २०
शाळांचा १०० टक्के,चार शाळांचा ९८ टक्के निकाल लागला आहे.
शाळानिहाय निकाल
पुढीलप्रमाणे...
---------------------------
पंडित नेहरू विद्यालय आष्टी, भगतसिंग
विद्यालय किन्ही, पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा, मच्छिंद्रनाथ विद्यालय सावरगाव,
हनुमान विद्यालय घाटापिंपरी, इंदिरा कन्या विद्यालय धामणगाव, श्रृंगेरी विद्यालय
ब्रम्हगाव,श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी,जोगेश्वरी विद्यालय पारगाव (जो.) निजाम पटेल
विद्यालय मेहकरी,कानडी खुर्द,कानिफनाथ विद्यालय निमगावचोभा,अश्वलिंग विद्यालय
पिंपळवंडी,राजीव गांधी विद्यालय मातावळी,संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा,क्रांतीसिंह
नाना पाटील विद्यालय चुंबळी, सय्यदमीरबाबा विद्यालय लोणी सय्यदमीर,संत बाळूदेव
महाराज विद्यालय साबलखेड, हरिनारायण स्वामी विद्यालय क-हेवाडी, छत्रपती शिवाजी
विद्यालय टाकळसिंग, यशवंतराव होळकर विद्यालय शिरूर या सर्व शाळांचा शंभर टक्के
निकाल लागला आहे.जयभवानी विद्यालय जळगाव,नागनाथ विद्यालय नागतळा, विठ्ठल विद्यालय
निमगाव बोडखा,श्रीराम विद्यालय कडा या चार शाळांचा ९८ टक्के निकाल लागला
आहे.ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट,वृध्देश्वर विद्यालय गहुखेलया दोन शाळांचा ९७
टक्के निकाल लागला आहे.यशवंतराव चव्हाण विद्यालय पोखरी,सुदर्शन विद्यालय सांगवी
पाटण,रोडेश्वर विद्यालय डोंगरगण,अहिल्याबाई होळकर विद्यालय टाकळी आमिया या शाळांचा
९६ टक्के निकाल लागला आहे.महेश विद्यालय रूईनालकोल, आंबिका विद्यालय
बेलगाव,प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव या शाळांचा ९५ टक्के निकाल लागला आहे.पाटोदा
उर्दु हायस्कुल पाटोदा,भैरवनाथ विद्यालय आंमळनेर पांडुरंग विद्यालय नांदुर,
जोर्तिलिंग विद्यालय कानडी बेलगाव या शाळांचा ९४ टक्के निकाल लागला आहे.माऊली
विद्यालय बोरोडी,आष्टी पब्लीक स्कुल आष्टी या शाळांचा ९० टक्के निकाल लागला आहे.
पं.नेहरु विद्यालय आष्टी
-------------------------------
शेतकरी शिक्षण संस्था
संचलित आष्टी शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा मार्च
२०२४ चा शेकडा निकाल शंभर टक्के लागला आहे.प्रथम - हर्षदा नितीनकुमार सुरवसे ९९.२०
टक्के (आष्टी तालुक्यात सर्वप्रथम), व्दितीय - शेख मोहम्मद अहमद मुजीब ९८.८० टक्के,
तृतीय - सानीका रामदास टकले ९८.६० टक्के गुण घेतले आहेत.या विद्यालयाचे २०५
विद्यार्थ्थी दहावी परीक्षेला बसले होते सर्वची सर्व उत्तीर्ण झाले.१४९
विद्यार्थ्थीनी विशेष प्राविण्य मिळविले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी
सांगीतले.
श्रीराम विद्यालय कडा
------------------------
-
कडा येथील श्रीराम
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी मार्च २०२४ परीक्षेचा एकूण वार्षिक
निकाल ९८.१ टक्के निकाल लागला आहे.प्रथम कु.नागरगोजे सिद्धिका सुभाष- ९६.८०
टक्के,व्दितीय -सुंबरे आदित्य संदीप ९६ टक्के द्वितीय -कु.फुंदे अनुष्का सतिष- ९६
टक्के,तृतीय - बनसोडे ओंकार निवृत्ती ९५.४० टक्के गुण मिळविले आहेत.
हरिनारायण
स्वामी विद्यालय

------------------------
आष्टी तालुक्यातील किसान शिक्षण संस्था
संचलित क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचा एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२४
चा शेकडा निकाल शंभर टक्के लागला आहे.प्रथम - सांगळे साक्षी गोरख ८८.६०
टक्के,व्दितीय - सांगळे कविता महादेव ८६.६० टक्के,तृतीय- सांगळे सुप्रिया अशोक
८६.४० टक्के,उत्तेजनार्थ शेख सुहाना सलीम ८६ टक्के गुण मिळाले आहेत.
इंदिरा कन्या
विद्यालय धामणगाव
------------------------------
शेतकरी शिक्षण संस्था संचलित
धामणगाव येथील इंदिरा माध्यमिक व कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२४ चा
शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये इंदिरा कन्या
विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. गुणानुक्रमे विध्यार्थी प्रथम - कु.लोखंडे
लक्ष्मी अशोक ९५ टक्के ,द्वितीय - कु.महाजन स्नेहल दिलीप ९४.४० टक्के,तृतीय चि.कोहक
विवेक राजू ९३.२० टक्के गुण मिळवत या विद्यार्थिनी यशस्वी होत विद्यालयाची यशाची
परंपरा कायम राखली आहे.
पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा
--------------------------
शेतकरी शिक्षण संस्था संचलित पिंपळा येथील पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयाचा मार्च २०२४ चा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला
आहे.प्रथम - भस्मे प्रतिभा रामदास- ९५.२० टक्के,व्दितीय -शेख अन्वर रशिद - ९२.४०
टक्के, तृतीय - भस्मे साक्षी पोपट- ९१.२० टक्के गुणानुक्रमे प्रथम,व्दितीय व तृतीय
आले आहेत.
वृध्देश्वर विद्यालय गहूखेल
--------------------------
आष्टी
तालुक्यातील गहुखेल येथील वृध्देश्वर विद्यलयाचा एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२४ चा
शाळेचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे.या शाळेत प्रथम आहेरकर सुमित नानासाहेब ९०.२०
टक्के द्वितीय वामन मयूर विष्णू ८८.४० टक्के,तृतीय शेकडे प्रितम लक्ष्मण ८७.८०
टक्के चतुर्थ - शेकडे अश्विनी भास्कर ८७.६० टक्के गुण मिळले आहेत.
महेश विद्यालयाचा
निकाल
----------------------------
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील महेश
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे.प्रथम फरांडे
अनुष्का महादेव ९४.६० टक्के,द्वितीय नालकोल प्रेम हरी ९४.२० टक्के,तृतीय - धोंडे
अपूर्वा सोमीनाथ ९३.८० टक्के गुण पटकावले आहेत.
अहिल्याबाई होळकर विद्यालयाचा निकाल
----------------------------
आष्टी तालुक्यातील टाकळी अमीया येथील अहिल्याबाई
होळकर विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च २०२४ परीक्षेचा एकूण वार्षिक निकाल ९६.२९
टक्के निकाल लागला आहे.प्रथम -सय्यद नजमा जाकिर ८८.४० टक्के, द्वितीय -खोटे अभिषेक
कृष्णा ८७.६० टक्के,तृतीय -भूकन वैष्णवी मल्हारी ८६.२० टक्के गुण मिळाले आहेत.
निजाम पटेल विद्यालयाचा निकाल*
---------------------------
आष्टी तालुक्यातील
मेहकरी कानडी खुर्द येथील निजाम पटेल विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला
आहे.प्रथम -गव्हाणे वैष्णवी मंगेश ९५.८० टक्के,द्वितीय - खराडे वैष्णवी कानिफनाथ
९४.४० टक्के,बोडखे वैष्णवी महादेव ९४.४० टक्के, देवकर श्रावणी सतीश ९४.४०
टक्के,तृतीय-गिलचे सुप्रिया भागवत ९४.२० टक्के गुण मिळाले आहेत.९० टक्क्यापेक्षा
जास्त १४ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.
नागनाथ विद्यालयाचा निकाल
-----------------------------
आष्टी तालुक्यातील नागतळा येथील नागनाथ माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी मार्च २०२४ परीक्षेचा एकूण वार्षिक निकाल ९८.७
टक्के लागला आहे.प्रथम-वनवे आदित्य संजय ८८.४० टक्के,द्वितीय-वायभासे दीपक
मच्छिंद्र ८७.८० टक्के,तृतीय-सानप अभिजीत राजेंद्र ८७.४० टक्के गुण मिळविले आहेत.
सुदर्शन विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
-------------------------------
आष्टी
तालुक्यातील सांगवीपटण येथील सुदर्शन विद्यालयाचा दहावी मार्च २०२४ परीक्षेचा
वार्षिक निकाल शंभर टक्के निकाल लागला आहे. प्रथम - भगत श्रीकांत विष्णू ९२
टक्के,गवारे मानसी महादेव - ९२ टक्के,गवारे प्रतीक्षा मारुती - ९२ टक्के,व्दितीय -
यादव भाग्यश्री दत्तात्रय ९१.५६ टक्के,तृतीय - कुलकर्णी सागर रामचंद्र ९१.२० टक्के
गुण मिळाले आहेत.
मोतीलाल कोठारी विद्यालयाचा ९९.६० टक्के निकाल
----------------------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या
कडा येथीला मोतीलाल कोठारी विद्यालयाने ९९.६० टक्के निकाल घेत परंपरा कायम
ठेवली.विद्यालयात मुलींनी मारली बाजी मारली.प्रथम-कु.गाडे प्राजक्ता सुनिल हिने
९८.४० टक्के,कु.सोनवणे श्रावणी महादेव,नाथ कांदबरी सचिन,गिऱ्हे संस्कृती बाळासाहेब
या तीन विद्यार्थ्यांनीनी समान ९७.४० टक्के गुण मिळवुन द्वितीय, एकशिंगे गौरव
बिबिषण व कुमखाले सार्थक शरद या दोन विद्यार्थ्यांनी ९६.२० टक्के समान गुण मिळवून
तिसरा क्रमांक पटकावला.याच मोतीलाल कोठारी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी
हर्षवर्धन राजेश राऊत यांने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले
आहेत.हर्षवर्धन यास ५०० पैकी ४५० गुण मिळाले.
जयभवानी विद्यालय जळगांव
--------------------------------------
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता
दहावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी- ९२ उत्तीर्ण
विद्यार्थी- ९१ शाळेचा शेकडा निकाल ९८ टक्के निकाल लागला.प्रथम - मुटकुळे मयुरी
महादेव- ९५.८० टक्के,द्वितीय- शिंदे अंजली परसराम- ९२.४० टक्के, तृतीय - जाधव सायली
रामदास- ९१.८० टक्के गुण घेतले.
संत वामनभाऊ विद्यालय पाटसरा
----------------------------------------
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित पाटसरा
येथील संत वामनभाऊ विद्यालयाचा शाळेचा मार्च २०२४ चा इयत्ता दहावीचा निकाल १००
टक्के लागला आहे. प्रथम - गर्जे किरण पांडुरंग,द्वितीय कु.मिरड कविता शिवाजी,तृतीय
- कु.गर्जे शुभांगी पांडुरंग गुणानुक्रमे आहेत.
श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी
------------------------------------
आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे.कु.साक्षी
नितीन धनवे ९२ टक्के ( प्रथम),पंकज पिराजी धोत्रे ९१.६० टक्के ( द्वितीय),
कु.प्रगती बंडू खराडे ९१.२० टक्के ( तृतीय) क्रमांक पटकावला आहे.या सर्व उत्तीर्ण
विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,डॉ.अजय धोंडे,
प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी. राऊत,प्रा.शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे,माऊली
बोडखे,संजय शेंडे, सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांनी शाळांचे
मुख्याध्यापकांनी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
---------------------------
0 टिप्पण्या