आष्टी (प्रतिनिधी)
पाटोदा येथील ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापु यांच्या संस्थेचे संत
तुकाराम महाराज विद्यालयाने दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.दहावी निकालाची
उज्ज्वल परंपरा कायम ठेवत विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. संस्कृतीची
जपवणुक व संस्कार देणारे संत तुकाराम महाराज विद्यालय या शाळेने निकालाची उज्ज्वल
परंपरा कायम राखत पाटोदा शहरात सर्वाधिक निकाल लावत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या
शाळेतून गुणवत्ते बरोबरच संस्कार व विविध विषयावर प्रबोधन केले जाते.पाटोदा येथील
संत तुकाराम महाराज विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला.प्रथम- गवळी पतंजली अरूण -
९९.२० टक्के,द्वितीय- गवळी वेदांत अरुण ९७.२० टक्के,तृतीय- रंधवे ऋषिकेश दत्तात्रय
९५.२० टक्के,९० टक्के पेक्षा जास्त ९ विद्यार्थी, ८५ टक्के पेक्षा जास्त पुढील
विद्यार्थी -भोसले संस्कृती शिवाजी ९३.८० टक्के,ढोले वैष्णवी महादेव ९३ टक्के,तिपटे
वैष्णवी हनुमान ९२.८० टक्के, ढाकणे अभिषेक अशोक ९१.२० टक्के, राऊत गीतांजली मारुती
९१.२० टक्के,राजगुरू सानिका संभाजी ९१ टक्के,नागरगोजे योगेश रामराव ९०.४० टक्के,
जायभाय वैष्णवी अण्णा ९०.४० टक्के,राऊत सिद्धि विष्णू ९० टक्के, भोसले मयूर
ज्ञानेश्वर ८९.८० टक्के,नागरगोजे ओमकार विठ्ठल ८९.६० टक्के, मोमीन हामजा सिराज
८८.८० टक्के, जायभाय दर्शन सुधाकर ८८.६० टक्के,राऊत रोशन साधू ८७.८० टक्के,पाटील
गणेश श्रीहरी ८७.२० टक्के, गीते प्रतीक बाळु ८७.६० टक्के, राऊत आदित्य ज्ञानेश्वर
८७.८० टक्के गुण मिळविले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष
ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापू,सचिव अरुण गवळी,विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश गवळी व
सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या