Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिदीनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन ........... मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर ....................................... ह.भ.प.कोकणे महाराज,रंधवेबापु महाराज ,उगले महाराज यांचे हरिकीर्तन*

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील सायकड गल्लीत जगदंबा देवी मंदिर आवारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.९ ते ११ जुन २०२४ या कालावधीत तीन दिवसांचा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केले आहे या सप्ताहात काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गीतापाठ पसायदान, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर (संगीत भजन) आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.रविवार दि. ९ जून रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे (चिखली),सोमवार दि. १० जून रोजी रात्री ह.भ.प. रामकृष्ण रंधवे वायु (गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड),मंगळवार दि. ११ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत विनोदाचार्य ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.नंतर महाप्रसाद होईल. सप्ताहात व्यासपीठ चालक म्हणुन ह.भ.प. रामदास महाराज डोरले (नाना), ह.भ.प. आसाराम महाराज डोमकावळे,मृदंगाचार्य:- ह.भ.प.रविंद्रमहाराज तवले, ह.भ.प.समाधान महाराज शिंदे,काकडा भजन सर्व भजनी मंडळ, खासबाग,आदित्य धोंडे, योगेश धोंडे गायनाचार्य ह.भ.प.गोपीनाथ पोकळे, ह.भ.प.बबन महाराज बळे,ह.भ.प.सुरेश महाराज डोमकावळे, ह.भ.प. नानासाहेब तवले विणेकरी पोपट धोंडे ह.भ.प.मुकुंद महाराज बुरांडे, ह.भ.प. लालासाहेब महाराज राक्षे ह.भ.प. किसन महाराज जगताप,ह.भ.प. शिवदास महाराज केरूळकर यांची साथसंगत लाभणार आहे. या सप्ताहाचे आयोजक कैलास दरेकर शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजेंद्र मोटे (जिल्हाध्यक्ष बीड), अशोक सुरवसे (जिल्हाध्यक्ष सहकार सेना) सचिन वाघुले (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना),बाबासाहेब दिंडे (तालुकाध्यक्ष,आष्टी), जयदिप मिसाळ,सतिश शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष), संजय फरताडे (तालुकाध्यक्ष,पाटोदा शेतकरी सेना),सुनिल पाचपुते (तालुका उपाध्यक्ष,आष्टी),तुषार चव्हाण (तालुकाध्यक्ष, शिरूर शेतकरी सेना), मच्छिंद्र गर्जे (तालुका उपाध्यक्ष), लहु भवर (तालुका उपाध्यक्ष), महेश अनारसे (शेतकरी सेना आष्टी,शहराध्यक्ष), महादेव म्हस्के,भरत चव्हाण (गटाध्यक्ष), कुणाल उगले, (जिल्हा उपाध्यक्ष),रामराजे काळे, सागर ढोबळे,योगेश घाडगे,किशोर डोमकावळे,लक्ष्मण टकले हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या