
आष्टी (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रचाराच्या तोफा सर्वत्र उधळत असताना शहर,वाड्या, वस्त्यासह गल्लीबोळात कार्यकर्ते आपापल्या पक्षासाठी प्रचार करायला लागले आहेत.दरम्यान लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आमदार शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांनी आपले स्वतःचे कुटुंबिक दुःख बाजूला सारून पंकजाताईंसाठी जिवाचे रान करत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन हात जोडून त्यांनी पंकजाताईंच्या विजयासाठी मतदार बांधवांना साद घातली आहे.
१३ मे रोजी बीड लोकसभासाठी मतदान होत आहे.अवघे चार-पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रचार गतिमान झाला आहे. कालच नरेंद्र मोदी यांची बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे सभा झाली. या सभेसाठी आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघातून उत्स्फूर्तपणे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले.माजी आ.भीमराव धोंडे यांचे छोटे बंधू बापूराव धोंडे यांचे चार दिवसापूर्वी हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.घरात प्रचंड दुःखाचा डोंगर उभारला असतानाही केवळ खास आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी त्यांनी हे दुःख बाजूला सारून मतदार संघातील मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे.माजी आमदार भीमराव धोंडे यांचे आष्टी तालुक्यासह पाटोदा तालुका आणि शिरूर कासार तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळे आणि त्यांच्या गोड मधुर स्नेहबंध स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता मोठी आहे.त्यांच्या या सामान्याविषयी असलेल्या भावनेमुळे त्यांच्या आव्हानाला लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात हे वास्तव आहे.हे स्वीकारत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह त्यांचे सुपुत्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे यांनी आपल्या प्रचंड अनेक कार्यकर्त्यांसह गावोगाव फिरून पंकजाताई मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या