आष्टी (प्रतिनिधी) भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आष्टीत दि.९ मे रोजी जाहीर सभा होणार असून आष्टी विधानसभा मतदारसंघातील बहाद्दर मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे. पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मतदारांचा व नागरीकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत असून त्यांचा विजय निश्चित आहे.त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत.जिल्ह्याच्या विकासासाठी व ऊस तोडणारा नाही तर ऊस पिकवणारा जिल्हा व तरुणांना रोजगार देणारा जिल्हा ओळख निर्माण करून देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना बहाद्दर मतदार बांधवांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे आज दि.९ मे रोजी आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे.भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे,रासप नेते महादेव जानकर, राजेंद्र म्हस्के, तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के भाजप महायुतीच्या मित्र पक्षातील पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.