Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकीच्या दुनियेतील गुणवंत शिक्षक प्रा.बिभिषण चाटे

माणुसकीच्या दुनियेतील गुणवंत शिक्षक प्रा.बिभिषण चाटे ------------------------------ '...उभ्या महाराष्ट्राला ज्ञानगंगेचे पावन दर्शन देण्यासाठी आणि समाजातील दुःखी माणसांचे जीवन सुखी करून सोडावे या व्यापक दृष्टिकोनातून आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांसह अनेक विचारवंतांनी अहोरात्र कष्ट आरंभिले; अशा थोरा मोठ्यांच्या विचारावर चालण्याची आज अनेक समाज धुरिणांची प्रमाणिक धारणा आहे .किंबहुना अगदी त्याच वाटेवर खारीचा वाटा उचलून शिक्षणातून माणसांची न संपणारी पूजा आरंभण्याचे महत्त्वपूर्ण कर्तव्य अर्थात प्रा.बिभिषण चाटे सरांनी गेल्या तीन दशकावून अधिक काळ केले आहे. विवेकातील आनंद शोधण्याची त्यांची धडपड त्यांच्या लेखणीतून पाहायला मिळते. कित्येक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांची बुद्धी क्षमता खऱ्या अर्थाने बहुजनांसाठी त्यांच्या परिवर्तनवादी विचारांची साक्ष देते.शिक्षक प्राध्यापक म्हणून काम करताना विद्यार्थी घडला पाहिजे.. यासाठी त्यांनी अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाची केलेली सेवा कौतुकास्पद आहे.शिक्षण प्रसार यामुळे सुखी समाज निर्माण होऊ शकतो,ही संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊंची प्रेरणादायी विचारसरणी त्यांच्या आजपर्यंतच्या लेखन वक्तृत्व या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.सहकार आणि शिक्षण महर्षी रामकृष्ण बांगर, प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य व सामाजिक कार्यकर्त्या सौ.सत्यभामाताई बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.बिभिषण चाटे सर यांचे लेखन शिक्षण वक्तृत्व निवेदन आदी सह क्षेत्रातील योगदान उत्कृष्ट राहिले आहे.आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो जयंतीच्या पुण्यतिथीच्या आणि अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या अत्यंत भारदस्त आणि अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेतून आपल्या गुणवंत्तेचे यशस्वी प्रदर्शन केले आहे. म्हणूनच त्यांच्या प्रचंड व्यापक विचार आणि कर्तव्यतेची दखल घेतली जाऊन त्यांना जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरचे अनेक उत्कृष्ट शिक्षक,गुणवंत निवेदक, आदर्श पत्रकार, उत्कृष्ट लेखक म्हणून सन्मान मिळाले आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांचा झालेला गौरव समस्त बीड जिल्हा वासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.आज ११ मे दिनी त्यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर संक्षिप्त प्रकाश टाकताना आनंद होतो आहे.त्यांच्या भविष्यातील यशस्वी आनंदी जीवन आणि कारकिर्दीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!
चौकट ------------------- *तीस वर्षाची निरंतर लेखन साधना!* -------------------------- गेली तब्बल ३० वर्ष सातत्याने जिल्हा विभागीय आणि वृत्तपत्रामधून राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक शैक्षणिक क्षेत्रामधील अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला घेऊन लेखन करण्याची त्यांची परंपरा आहे. कुठल्याही विषयाला खऱ्या अर्थाने समांतर न्याय देण्याची त्यांची भूमिका कौतुक पात्र आहे. शब्दांचा प्रचंड साठा, त्यातील मर्म,गुणवत्ता.. यामुळे प्रतिभावान शब्दांचे मोल आधोरिखित होते. *आकाशवाणीवरील अनेक भाषणे लोकप्रिय!* ----------------------------- या कालावधीमध्ये प्रा.चाटे सरांनी बीड आकाशवाणी केंद्रावर अनेक प्रसंगी प्रासंगिक विषयाला अनुसरून भाषणे केली.ती प्रसिद्ध व लोकप्रिय झाली. राष्ट्रीय सण उत्सव पद्धती परंपरा या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले चिंतन बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात संस्मरणीय ठरले आहे.या एकूणच, त्यांच्या विविध लेखन सूत्रसंचालन निवेदन आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा विभाग आणि राज्य पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या