

आष्टी (प्रतिनिधी)
सध्याच्या धकाधकीच्या काळात स्वतंत्र्याच्या नावाखाली स्वराज्य
सुरू असून केवळ शिक्षण घेतल्यामुळे सुशिक्षित मिळवणारे स्वतःच्या सुखासाठी आपल्या
जन्मदात्या वयोवृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या चांगली आर्थिक परिस्थिती
असणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी यांच्या पेक्षा दुष्काळात निसर्गाशी झगडून देखील कष्ट
करणारा शेतकरी वर्ग आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाही त्यामुळे शेतकरी
हाच खरा खरा श्रीमंत आहे असे प्रतिपादन संत मदन महाराज बिहाणी देवस्थान विश्वस्त
मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले. आष्टी तालुक्यातील घाटा
पिंपरी येथील संत मदन महाराज बिहारी यांच्या आशीर्वादाने आयोजित ज्ञानेश्वरी पारायण
श्रीराम कथा ज्ञान यज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन सेवेमध्ये ते
बोलत होते. यावेळी ह.भ.प.निवृत्ती बोडखे महाराज,ॲड.चंद्रकातभाऊ आजबे, विक्रम
पोकळे,पत्रकार उत्तम बोडखे, संतोष महाराज मोरे,परसराम महाराज कोल्हे,बबन महाराज
मगर,मोहन महाराज आमटे,घोडके महाराज,हंसराज महाराज मगर,संपत महाराज दानवे, बबन
महाराज घुमरे,भाईचंद महाराज झांजे,अशोक देसाई, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम
पोकळे,सरपंच प्रल्हाद मुळीक,मनोज गाढवे,पोपट शेकडे, पत्रकार अंकुश तळेकर,पत्रकार
नितीन कांबळे ,बाबासाहेब मुळीक, शामराव आबा तळेकर,मच्छिंद्र मुळीक, विठ्ठल
तळेकर,शाहुराजे झांजे, विनायक मुळीक,सेवानिवृत्त उपअभियंता पी.ई.तळेकर (आप्पा),
सदाशिव घुमरे,गोवर्धन तळेकर,प्रवीण मुळीक,रविंद्र बायकर, एम.बी.तळेकर, महादेव
झांजे,विक्रम झांजे,राजेंद्र तळेकर,विजय तळेकर,सिद्धेश्वर झांजे, बबन चौधरी आदि
मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल पुढे म्हणाले की,मुले असावेत तर ते
चांगली मुले आहेत असे म्हणण्याच्या लायकीचे असावेत. अन्यथा मुले नसले तरी चालतील
अशी परिस्थिती आहे आपल्याला प्रभू रामचंद्र सारखे दैवत हे अत्यंत आदर्श असून सावत्र
आईच्या आदेशावरून आनंदाने वनवासात गेले आहेत.प्रभू श्री रामचंद्र हे मातेच्या
आज्ञेनुसार वनवासात गेले आहेत परंतु आज त्यांच्याच भूमीमध्ये भारत देशामध्ये
वृध्दाश्रम उभारले जात आहेत.वृध्दाश्रम सुरु करावे लागणे हे हिंदुस्थान देशासाठी
भुषण नसून दूषण आहे त्यामध्ये आणखी दुःखद बाबअशी आहे की या वृद्धाश्रमामध्ये
सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचेच आई वडील यांना ठेवले जात आहे
आहेत.मात्र सतत दुष्काळाच्या छायेत असून देखील काळ्यामातीत राबणा-या शेतकऱ्यांचे
माता पिता वृध्दाश्रमात पाठवले जात नाहीत.हे तपासून पाहा त्यामुळे शेतकरीच खरे
श्रीमंत आहेत आहेत असे सांगत ज्या घरातील वयोवृद्ध आई-वडील वृद्धाश्रमात जात आहेत
त्यांची मुले आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीचे संस्कार करणार आहेत कदाचित अशा
प्रकारचे संस्कार कमी पडल्यास त्यांची मुले आपल्या आई वडील यांना वृद्धापकाळ मध्ये
वृद्धाश्रमात पाठविण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारे धोका ओळखून समाजातील
सुशिक्षित मिळवणाऱ्या व्यक्तींनी आपापल्या आई-वडिलांना वर्धा श्रमात पाठवू नये उलट
परमेश्वरा इतकीच सेवा आपल्या आई-वडिलांची करावी. याबाबत अत्यंत परिणामकारक आणि
सुंदर असे समाज व्यवस्थेचे वर्णन करताना ते पुढे म्हणाले की संसारातील गोष्टींनी
कोणाचीही तृप्ती होत नसते संसार सुखाचे मागे जाऊनही मानव अखेर अतृप्तच राहत असतो
आपण श्रीकृष्णाच्या चरित्राचे उच्चारण करतो मात्र व्यवहारात आणि आचरणात मात्र
विसंगती आढळून येते कृष्णाच्या चरित्रातील दही दुधाची चोरी या गोष्टीतून त्यांनी
अध्यात्म कारण भक्ती कारण समाजकारण आणि राजकारण ही चारही कारणे होती त्याचा शोध आपण
सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले...
0 टिप्पण्या