


आष्टी (प्रतिनिधी)
दुष्काळ आणि दिवसेंदिवस वाढणारे तापमान याची दाहकता पाहता
वृक्षारोपण,वृक्ष संगोपन हे काळाची गरजेचे असल्याचे लक्षात घेत आष्टी तालुक्यातील
गावचे सरपंच,शाळा, कॉलेज,शासकीय कार्यालय तीन वर्ष झाडांचे संगोपन करण्याचे लेखी
हमी देईल त्यांच्यासाठी धनश्री पतसंस्थेतर्फे १०० वटवृक्ष ट्री गार्ड सहित लावून
देणार असल्याची आष्टी नगरपंचायत माजी नगराध्यक्ष तथा धनश्री पतसंस्थेचे चेअरमन
वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांनी आवाहन केले आहे. आष्टी तालुक्यातील जो सरपंच तीन
वर्ष झांडाचे संगोपन करण्याची लेखी हमी घेणार त्या ग्रा.पं.ला अथवा शाळा,कॉलेज,
शासकीय कार्यालयाला धनश्री पतसंस्थेतर्फे १०० वटवृक्ष ट्री गार्डसहीत लावुन देणार
असल्याचे वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांनी सांगीतले.धनश्री पतसंस्थातर्फे सन
२०१६पासुन आष्टी व परिसरात जवळपास ९०० वट वृक्षाची लागवड करुन त्याचे तीन वर्षासाठी
संगोपन केलेले आहे.सन २०१६ ते २०२० पर्यंत आम्ही आष्टी शहरात वृषारोपन केलेले
आहे.२०२१ ते २०२३ मुर्शदपुर ग्रा.पं. कडा ग्रा.प.पोखरी ग्रा.पं.
आंधळेवाडीहद्दीत
झाडे लावलेली आहेत.संस्था दरवर्षी एका जिल्हा परिषदेच्या शाळेला शैक्षणिक कामासाठी
५० हजार रुपयांची मदत करत आलेली आहे आतापर्यंत पतसंस्थेने जि.प.कन्या शाळा कडा,
जि.प.कन्या शाळा आष्टी, जि.प.माध्य शाळा टाकळसिंग यांना आर्थिक मदत केलेली आहे.
त्याचबरोबर पतसंस्था सामाजिक बांधलकी म्हणुन २०१४ पासुन दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्य
निधीस मदत करते असे अनेक सामाजिक बांधीलकी जपणारी धनश्री पतसंस्थेची ओळख आहे.हाच
उद्देश ठेऊन गावखेड्यामधील सरपंच,शाळा,कॉलेज, शासकीय कार्यालय आम्ही लावलेल्या
झांडांचे तीन वर्ष संगोपन करण्याची लेखी हमी घेईल त्या ग्रामपंचायतीला आम्ही
पतसंस्थेच्या माध्यामातुन १०० वटवृक्ष,खड्डे खेदुन,काळी माती व शेणखत टाकुन, बांबु
व ट्री गार्ड लाऊन त्याची लागवड करून देऊ यामध्ये वटवृक्षांमध्ये
पिंपळ,वड,लिंब,चिंच या पारंपारीक झाडांचा समावेश असेल या साठीचा सर्व खर्च पतसंस्था
करणार आहे. दि.१ जुलै २०२४ साठी ज्या ग्रामपंचायतीला, शाळा,कॉलेज अथवा शासकीय
कार्यालयाला वृक्षारोपण करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी अथवा धनश्री
पतसंस्थेचे व्यवस्थापक जितेंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधावा दि.१ जुलै २०२४
साठीवरील नियमाप्रमाणे वृक्षारोपण व संगोपन करण्याची इच्छा असल्यास सरपंच,
शाळा,कॉलेज प्रमुखाने अथवा कार्यालयीन प्रमुखाने आम्हाला तात्काळ संपर्क करावा अशी
माहिती धनश्री पतसंस्था आष्टीचे चेअरमन वृक्षमित्र तथा माजी नगराध्यक्ष रंगनाथ
धोंडे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या