
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथे गुरुवर्य संत मदन महाराज
बिहाणी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या प्रेरणेतून
ज्ञानेश्वरी पारायण,श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे.या
सप्ताहात आळंदीचे कथा प्रवक्ते ह.भ.प.रामायणाचार्य संतोष महाराज मोरे यांची कथा
सुरु झाली आहे. या सप्ताहात ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक विश्वस्त,जोग महाराज
(आळंदी) यांंचे कीर्तन झाले. ह.भ.प.सोहम महाराज काकडे (श्री क्षेत्र मेहकर
(बुलढाणा), रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे (श्री क्षेत्र आळंदी), ह.भ.प.
भागिरथ महाराज मते (श्री क्षेत्र वडीकळा, जालना), ह.भ.प. डॉ.नारायण महाराज जाधव
(वेदांत सत्संग समिती) ( आळंदी देवाची) यांचे हरिकीर्तन झाले.आज गुरुवार
ह.भ.प.स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत (श्री क्षेत्र गेवराई) यांंचे कीर्तन होणार
आहे.उद्या शुक्रवार दि.२४ मे रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत राष्ट्रीय धर्माचार्य,समाज
प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे.
शुक्रवार दि.२४ मे रोजी ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर (अध्यक्ष श्री क्षेत्र
वृध्देश्वर देवस्थान) यांचे रात्री हरिकिर्तन होणार आहे.शनिवार दि.२५ मे रोजी सकाळी
१० ते १२ यावेळेत कडा येथील संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज
बहिरवाल यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
0 टिप्पण्या