आष्टी (प्रतिनिधी )

एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित मातृदिन काव्य
सप्ताहानिमित्त दि.१३ मे रोजी १३ वे. राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन संपन्न झाले.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी अहमदनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत शिंदे तर
उद्घाटकपदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) यांची एकता
कोअर कमिटीने निवड केली होती.यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना शशिकांत शिंदे यांनी
अखिल भारतीय स्तरावरील काव्य संमेलने रसिक श्रोत्यांअभावी ओस पडत चालली असून त्याला
पर्याय म्हणून एकता सारख्या संस्थानी ग्रामीण भागात घेतलेली संमेलने समर्थपणे उभी
राहू लागली आहेत. ढासळत्या सामाजिक व्यवस्थेवर जाहीर चिंता व्यक्त करतानाच या
दलदलीतून बाहेर पडायचे असेल तर समाजाला सकस कविताच बाहेर काढू शकते असे प्रतिपादन
त्यांनी केले. यावेळी एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष
साहित्यिक अनंत कराड, मार्गदर्शक प्रा.डाॅ.भास्कर बडे, सचिव पत्रकार गोकुळ पवार,
कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर,मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, विभागीय
संघटक संपादक राजा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मातृदिन काव्य सप्ताहाच्या
दुसर्या तथा एकताच्या १२ व्या.राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनात छाया बेले
(नांदेड),नारायण खरात (जालना), अंजली गवई (बीड), शहादेव सुरासे (पैठण), प्रविण घुले
(पालघर) हे निमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते. एकता फाउंडेशन अहमदनगर जिल्हा
प्रसिद्धी प्रमुख पत्रकार कवी बाळासाहेब कोठुळे यांनी काव्य संमेलनाचे बहारदार
सूत्रसंचालन केले. या काव्य संमेलनात एकता फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांसह
महाराष्ट्रभरातील अनेक कवी कवयित्री सहभागी झाले होते.
चौकट -
-------------
0 टिप्पण्या