
आष्टी (प्रतिनिधी)
मुलांना स्वावलंबी होण्यासाठी केळसांगवी येथील संत मदन महाराज
गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे
यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ ते १६ मे या कालावधीत आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे
बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोपानिमित्त आज
बुधवार दि.१५ मे रोजी रात्री ह.भ.प.रामदास डोरले महाराज यांंचे हरिकीर्तन होणार
आहे. उद्या गुरुवार दि.१६ मे रोजी सकाळी १० ते १२ यावेळात भागवताचार्य ह.भ.प.निळकंठ
महाराज तावरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या शिबिरात मुलांनी सकाळी
उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःची कामे स्वतः केली.यामुळे मुले स्वावलंबी
होण्यास मदत झाली.उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून मुले रात्री उशिरापर्यंत (मोबाईल)
टि.व्हि.वरील मालिका,सिनेमे पाहत बसतात आणि सकाळी उशिरा उठतात.यामुळे त्यांची
शारीरिक हानी होते.बालसंस्कार शिबिरात मुलांना सकाळी लवकर उठून प्राणायाम आणि
व्यायाम शिकवला गेला.उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या मुलाने नवीन काहीतरी शिकावे असे
सर्व पालकांना वाटते परंतु त्यासाठी योग्य असा पर्याय सापडत नाही. आष्टी
तालुक्यातील केळसांगवी येथील श्री संत मदन महाराज गुरुकुल विद्यापीठ वारकरी शिक्षण
संस्थेतर्फे गेली १३ वर्षापासुन उन्हाळी बालसंस्कार शिबीर आयोजित केले जाते.या
बालसंस्कार शिबिरात पखवाज वादन, शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम,तबला आदि विषय
शिकविले जाते. धार्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी या शिबिरातील विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले.या शिबीरातील विद्यार्थ्यांकरिता शिरापूर, आनंदवाडी,सराटेवडगांव
ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.चांगले शिक्षण मिळण्यासाठी जे शिक्षण
आळंदी,पंढरी,पैठण येथे प्राप्त होते तेच शिक्षण या श्री संत मदन महाराज गुरुकुल
विद्यापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भागवताचार्य निळकंठ महाराज तावरे
यांच्या माध्यमातून उपलब्ध केले आहे.आष्टी तालुक्यातील ही गुरुकुल संस्था म्हणजे
बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर संस्था आहे.२०१६ पासून ही संस्था कार्यरत
आहे. बालसंस्कार शिबिराचे कार्य २०१३ पासून सुरु आहे म्हणून सर्व समाज घटकांनी
याकडे लक्ष देऊन गुरुकुलाच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करावी.या बालासंस्कार
शिबीराचा लाभ बहुसंख्य विद्यार्थ्यांंनी घ्यावा असेही आवाहन भागवताचार्य
ह.भ.प.निळकंठ तावरे महाराज यांनी केले आहे.
0 टिप्पण्या