आष्टी (प्रतिनिधी)
उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असतानाच पाणीटंचाईने डोके वर
काढण्यास सुरुवात केली आहे.आष्टी तालुक्यात ४५ ठिकाणी टँकर सुरू असून आणखी ३५
गावांना टँकर मंजूर करण्यात यावे अशी मागणी होत आहेत.यामध्ये आजी,माजी आमदारांच्या
गावांचा देखील समावेश आहे.आष्टी तालुक्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने आणि सध्या
उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाई वाढली आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी ,
धनगरवाडी ( डोईठाण ),सुंबेवाडी खुंटेफळ,चिंचोली या गावांमध्ये सध्या टॅंकरने
पाणीपुरवठा केला जात आहे.याशिवाय आष्टी तालुक्यातील २५ गावांमध्ये ४५ टॅंकरने
पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आले आहे . जामगाव,पारगाव जोगेश्वरी,खडकत,
दौलावडगाव येथे प्रत्येकी दोन टॕकर्स सुरु आहेत,हरिनारायण आष्टा,लोणी सय्यदमीर येथे
प्रत्येकी तीन टॕकर्स सुरु आहेत. यासह इतर गावांचा समावेश
आहे.बीडसांगवी,सराटेवडगाव,मांडवा, रुईनालकोल,शिराळ यासह १३ गावांमध्ये टँकर
मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत तर कडा अंतर्गत येणाऱ्या वस्त्या,दादेगाव
आणि आरणविहिरा लगतचा तांडा या ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या
मध्यात टँकरची संख्या ८० हून अधिक होणार असल्याने पुन्हा एकदा टँकर पर्व सुरू झाले
आहेत. टॕकर्स मंजुर गावे ------------------- जामगांव, देविगव्हाण,पारागांव
जो.,बळेवाडी,लोणी सय्यदमीर, खडकत,दौलावडगांव,केळ,सोलेवाडी, वाळुंज,तवलवाडी,
हारेवाडी,मराठवाडी, पिंपरीघाटा, कहेवडगांव,पांगरा, पिंपळगाव घाट,मराठवाडी,अंभोरा,
सांगवी आष्टी,देऊळगांव घाट,बांदखेल, हिवरा,भोजेवाडी,पिंपळा,धनगरवाडी,
सोलापुरवाडी,मांडवा,खरडगव्हाण,
काकडवाडी,खडकवाडी,वाघळुज,जळगाव,बीडसांगवी,सराटेवडगांव, आनंदवाडी,रुईनालकोल या
गावांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या