





आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील विविध मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साहात मतदान केले या मध्ये सनदी अधिकारी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी आष्टीतील पंचायत समितीमधील मतदान केंद्रावर मतदान नोंदवले त्यांचे बरोबर त्यांचे वडील सेवानिवृत्त तहसीलदार साहेबराव चव्हाण यांच्यासह अनेक वयोवृद्ध नागरिकांचा ही सहभाग दिसून आला.जामगाव येथे आ.सुरेश धस,
शिराळ येथे आ.बाळासाहेब आजबे,
रूईनालकोल येथे माजी आ.भीमराव धोंडे,कोयाळ येथे माजी आ.साहेबराव दरेकर, समाजसेवक विजय गोल्हार यांच्यासह मान्यवरांनी मतदान केले.
आष्टी तालुक्यातील फत्तेवडगाव येथील ९० वर्षीय शशिकला यशवंत काळे या आजीने मतदान केंद्रावर चालत येऊन मतदान केले.कडा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीप काळे यांच्या मातोश्री असलेल्या शशिकला काळे यांचे दोन महिन्यापूर्वी पायाचे ऑपरेशन झाले होते तरी ही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.कडा येथे लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १०४ वय असणाऱ्या कौशल्याबाई दळवी यांनी मतदानाचा हक्क बजावला.जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचे चुलते भगवान दशरथ बोडखे (वय १०७) यांनी सराटेवडगाव अंतर्गत येणाऱ्या आनंदवाडी येथे मतदान करत लोकशाही उत्सवात सहभाग घेतला.यांच्यासह बबन रामभाऊ रामभाऊ बोडखे (वय ६०) यांचे दोन्ही पाय निकामे असताना चालता येत नसताना देखील ते आनंदवाडी मतदान केंद्रात जाऊन तर ३८ वर्षीय शिवाजी तुकाराम बोडखे,
आणि संधीवाताने पुर्णपणे पाय निकामे झाले असताना पंकज भानुदास बोडखे (वय २५),श्रीमती जैतुनबी जाफरभाई शेख (वय ९०),गहिनीनाथनाना बोडखे (वय ९५) यांनी आपला मतदानाचा हक्क बजवला.विशेष बाब मागील दोन महिन्यांपूर्वीच श्रीमती शशिकला काळे यांचे खुब्याजवळील पायाचे हाड मोडले होते.९० वर्षे वय असलेल्या आशा रुग्णाचे मोडलेले हाड पुन्हा ठीक होऊन रुग्ण स्वतःच्या पायावर उभा राहील याची खात्री कमीच असते. मात्र काळे परिवाराने योग्य निर्णय घेत अहिल्यानगर येथील साईदिप हॉस्पिटलमध्ये डॉ.एस.एस.दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शशिकला काळे यांची पायाच्या हाडाची शस्रक्रिया केली आणि योग्य काळजी घेतल्याने अवघ्या दोन महिन्यात त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून आज लोकशाहीच्या या उत्सवात स्वतः मतदान करुन सहभागी झाल्या.श्रीमती शशिकला यशवंतराव काळे या कडा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे,आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पी.वाय.काळे, पुणे येथे बांधकाम व्यवसायिक असलेले जहाँगीर हॉस्पिटलचे माजी जनरल मॅनेजर राजेंद्र काळे तसेच इंजिनिअर झुंबर काळे यांच्या मातोश्री आहेत.श्रीमती शशिकला काळे यांच्या परिवारात एकूण ३८ सदस्य आहेत.फत्तेवडगाव येथील या परिवारातील सर्वच सदस्य उच्चशिक्षित असून काही सदस्य फिनलँड,अमेरिका सारख्या परदेशात देखील कार्यरत आहेत.
0 टिप्पण्या