Ticker

6/recent/ticker-posts

शांताई हॉस्पिटलचे भव्य वास्तुत स्थलांतर

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील प्रा.वसंत वारंगुळे यांचे चिरंजीव डॉ.विशाल व सौ.डॉ.कल्पना विशाल वारंगुळे यांच्या शांताई हॉस्पिटलच्या स्थलांतरित भव्य वास्तूचे उद्घाटन माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी माजी शिक्षण सभापती नियामत बेग,ह.भ.प.चौधरी,कोल्हे, लेकुरवाळे महाराज,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर यांनी डॉ.विशाल आणि कल्पना विशाल वारंगुळे यांचे रुग्णसेवेबद्दल कौतुक केले.गरजु रुग्णांना तात्काळ आणि अल्पदरात सेवा दिल्यामुळे ही सेवा समाजसेवेच्या उच्चस्तरावर पोहोचते असे दरेकर म्हणाले.या वास्तूच्या उद्घाटनाबद्दल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे,डॉ.मधुकर हंबर्डे, डॉ.राहुल टेकाडे,युवा नेते जयदत्त धस,सतीशआबा शिंदे,डॉ.नदीम शेख, डॉ.प्रकाश झांजे,डॉ.प्रवीण धस,बबन करांडे,प्रवीण फुंदे,शरीफ शेख,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,प्रा.राम हंबर्डे,प्रा. साहेबराव नाईकवाडे,प्रा.पिसाळ, डॉ. प्रदीप अकोलकर,डॉ.अभय मस्के,आष्टी मेडिकल असोसिएशन,आष्टी लॅब असोसिएशन,राजकीय,सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक,वैद्यकीय,पत्रकार आदि मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.सचिन वारंगुळे,अतुल वारंगुळे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या