Ticker

6/recent/ticker-posts

बागाईतदार हा शब्द अंबादास अनारसे दाजी यांनी सार्थ केला ........... ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल

आष्टी (प्रतिनिधी) मृत्यु येतो तेव्हा ना संपत्ती,ना सत्ता कामाला येत नाही.हे ध्यानात ठेवा. आपल आहे ते कधीच नष्ट होत नसते आणि जे नष्ट होते ते आपले कधीच नसते.जे आपले नसते त्यालाच आपण आपले म्हणत बसतो.दिन रजनी नामजप करणारा संत असतो.दिर्घ काल साधना केल्याशिवाय पुण्य किंवा फल मिळत नसते.संसारात सुख आनंद नसतो तर परमार्थात आनंद असतो परंतु सर्वसामान्य माणुस सांसारातच रमतो.अंबादास अनारसे यांनी जीवनात परोपकारा केला.ईतरांना मदत करणारे ते सामाजिक कार्यकर्ते होते.त्यांना या पंचक्रोशीत बागाईतदार या नावाने प्रसिध्द होते.त्यांच्या परोपकारी जीवनाने ते अमर झाले आहेत. " बागाईतदार " हा शब्द अंबादास अनारसे दाजी यांनी सार्थ केला आसे प्रतिपादन कडा येथील संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले. याजसाठी केला होता अट्टाहास , शेवटचा दिस गोड व्हावा या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांंच्या साधन व साध्यभाव सांगुन जीवन मुक्तीचा मार्ग सांगणा-या अभंगावर ह.भ.प.बबन बहिरवाल यांनी निरुपन केले. आष्टी तालुक्यातील केरुळचे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कै.अंबादास श्रीपती अनारसे यांंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाजप्रबोधनकार रामकृष्ण रंधवे बापु , रामहरी पाचपुते महाराज, गणेश महाराज परिहार, संतोष महाराज मारे, अनिकेत चांगुणे ,ह.भ. प.निवृत्ती बोडखे महाराज,दिनकरराव तांदळे,विठ्ठलराव बन्सोडे, बाबुराव पाटील सुर्यवंशी, बाबासाहेब आंधळे, अशोक साळवे,रावसाहेब लोखंडे बापुराव धोंडे, नामदेव धोंडे,राजेंद्र धोंडे,अभय धोंडे ,प्रा. संजय धोंडे,सदाशिव तुपे,पत्रकार उत्तम बोडखे,शंकर देशमुख, नामदेव राऊत,प्रा. सुभाष रासकर, केशव शिंदे,सुदामकाका झिंजुर्के,दादा जगताप, चेअरमन बाबासाहेब सुर्यवंशी,भाऊसाहेब गोंदकर,आदि सामाजिक,राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या